Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडअंबाजोगाईच्या बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे, पिडिता दीड ते दोन महिन्याची गरोदर, पोलिसांनी...

अंबाजोगाईच्या बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे, पिडिता दीड ते दोन महिन्याची गरोदर, पोलिसांनी अत्याचार केल्याचाही आरोपबीड/अंबाजोगाई (रिपोर्टर)- अंबाजोगाईतील त्या बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे बाहेर येत असून पतीच्या आणि माहेरी वडिलांच्या लैंगिक छळाला कंटाळलेल्या संबंधित पिडीतेवर रोज दोनपेक्षा अधिक जण बलात्कार करत असल्याची बाब समोर येत असतानाच लॉजवर पकडल्यानंतर पोलिसांनीही संबंधित पिडितेवर अत्याचार केल्याचा आरोप पिडितेने केला असून संबंधित मुलगी गरोदर असल्याचे समोर आले आहे. या आधी दोन ते तीन वेळेस तक्रार देण्यासाठी आपण पोलिसात गेल्याचेही तिने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून सर्वच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


आठ वर्षाची असताना आई मरण पावली. वडिलांनी 13 व्या वर्षी बालविवाह लावून दिला. विवाहनंतर पतीच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने माहेर गाठलं. तिथंही वडिलांकडून लैंगिक छळ सुरू झाला. म्हणून घर सोडलं. जेवणाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार झाला. येथून सुरू झालेलं अंबाजोगाईचं हे बलात्कार प्रकरण रोज नवे आणि धक्कादायक खुलासे करत असून या पिडितेवर सर्रासपणे अत्याचार केले जात होते. लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला जात होता. संबंधित पिडितेला विश्‍वासात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलते केले असता धक्कादायक बाब समोर आली असून लॉजवर पकडण्यात आल्यानंतर पोलिसांनीही तिच्या सोबत अत्याचार केल्याचे तिचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तपासात पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. दुसरीकडे सदरील मुलगी ही दीड ते दोन महिन्याची गरोदी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोनपेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!