Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडएसटी कर्मचार्‍यांच्या संपाला बीड जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा आंदोलनकर्त्यांना दिले जेवण

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला बीड जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा आंदोलनकर्त्यांना दिले जेवण

बीड (रिपोर्टर)- एसटी कर्मचार्‍यांचा आपल्या मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून राज्यभरात संप सुरू आहे. या संपाला बीड जिल्हा व्यापारी महासंघाने आपले समर्थन दिले असल्याचे व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांनी म्हटले आहे.


एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत. या कर्मचार्‍यांच्या संपाला बीड जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी, तालुकाध्यक्ष विनोद ललवाणी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी म्हटले आहे. दरम्यान महासंघाच्या वतीने आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!