Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडधारूरच्या घाटात पुन्हा टेम्पो पलटला रुंदीकरणाचा प्रश्न कधी मिटणार?

धारूरच्या घाटात पुन्हा टेम्पो पलटला रुंदीकरणाचा प्रश्न कधी मिटणार?


किल्ले धारूर( रिपोर्टर) धारूर शहरातील घाटामध्ये आज पहाटे पुन्हा एक कांदा घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला आहे यामुळे टेम्पो चक्काचूर झाला असून खूप मोठे नुकसान झाले आहे चालक व किन्नर किरकोळ जखमी झाले आहेत दिवसेंदिवस अपघातांची मालिका सुरूच असल्याने रुंदीकरणाचा प्रश्न कधी मिटणार आम्हाला न्याय कधी मिळणार ?असा प्रश्न संतप्त गाडी चालकांनी उपस्थित केला आहे.

धारुरच्या घाटात आज पहाटे सोलापूर हुन कांदा घेऊन जाणारा ट्रक टेम्पो क्रमांक एम एच 04 डी एस 9217 पलटी झाला आहे अरुंद रस्त्यामुळे हे अपघात दिवसेंदिवस होत आहेत यामध्ये जीवितहानी तसेच वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात होत असून देखील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे याकडे लक्ष नाही यामुळेच दिवसेंदिवस दररोजच अपघात पलटी होणे हे आता येथील नागरिकांसाठी नित्याचे झाल्याचे दिसून येत आहे नागरिकांना तसेच चालकांना जीव मुठीत धरून धारूरच्या घाटातून प्रवास करावा लागत आहे प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील घाटातील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न सोडवला जात नसल्याने धारूरच्या जनतेमध्ये प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना बाबत रोष निर्माण झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!