नेकनूर (रिपोर्टर)- 15 व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेवर तरतूद केलेल्या रकमेपेक्षा दीड लाख रुपये जास्तीचा खर्च दाखवून बील उचलणे, कोणतीही खरेदी न करता दोन लाख रुपये उचलणे आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि वार्डनिहाय ग्रामपंचायत सदस्याच्या आरक्षण सोडतीला उपस्थित न राहणे या व इतर बाबींसाठी दोषी धरून ग्रामसेवक बहिरवाळ बी.एन. यांना काल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी तडकाफडकी निलंबीत करत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
बहिरवाळ यांनी नेकनूर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीमध्ये 7 लाख 53 हजार 517 रुपये खर्च केले. या रकमेवर 1 लाख 56 हजार 473 रुपयांचे आगाऊ बिल दाखवत ते स्वत: उचलत अपहार केला आहे. सोबतच वित्त आयोगातून खरेदीसाठी विविध खासगी एजन्सींना कोणतीही खरेदी न करता 2 लाख रुपये ग्रामपंचायत खर्चातून उचलत अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे. लोकांसोबत मगरुरीने वागणे, ग्रामपंचायत कार्यालयात कधीतरी उपस्थित राहणे आणि ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदाच्या आरक्षणाला महसूल आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना सुद्धा स्वत: ग्रामसेवक या नात्याने उपस्थित न राहिल्याचा ठपका ठेवत काल बहिरवाळ बी.एन. या ग्रामसेवकाला सीईओंनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेशही सीईओंनी दिले आहेत. बहिरवाळ यांनी साडे तीन लाखांचा घोटाळा कागदोपत्री सिद्ध झााल असला तरी जवळपास पावणे दोन कोटी रुपयाचंा घोटाळा बहिरवाळ यांनी विविध योजनात केला आहे. याबाबतचे सर्वच लेखी पुरावे जिल्हा परिषदेला सादर केलेले आहेत आणि तब्बल दोन वर्षे त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सायं. दैनिक बीड रिपोर्टरने वारंवार आवाज उठवलेला आहे. त्यामुळेच आज सीईओ यांनी बहिरवाळ यांनी निलंबीत केले आहे. जि.प.च्या अनेक ग्रामसेवकांना निलंबन ही शिक्षा वाटत नाही, तर ते बक्षिस वाटते कारण घोटाळा करायचा, अपहारातील पैसे खर्च करायचे आणि जेव्हा सिद्ध होईल तेव्हा ते पैसे भरायचे. मधल्या काळात एवढी रक्कम ग्रामसेवकघांना वापरण्यास मिळते आणि पुन्हा नियुक्ती झाल्यावर एक तालुका बदलून दुसर्या तालुक्यात मिळते म्हणून अपहार केल्याचे त्यांना काहीच वाटत नाही.