Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईम15 लाखांंचं सोयाबीन धुळ्याला पोहचलच नाही ट्रान्सपोर्ट मालकासह गाडी मालकावर नेकनूर ठाण्यात...

15 लाखांंचं सोयाबीन धुळ्याला पोहचलच नाही ट्रान्सपोर्ट मालकासह गाडी मालकावर नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल


पोलिसांनी एका आरोपीला घेतले ताब्यात
नेकनूर (रिपोर्टर)- चौसाळ्याहून धुळ्याला एका ट्रकद्वारे 15 लाख रुपयांचे सोयाबीन पाठविण्यात आले होते. मात्र सदरील हे सोयाबीन धुळ्याला पोहचले नसल्याचे व्यापार्‍याच्या लक्षात आल्यानंतर व्यापार्‍याने याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ट्रान्सपोर्ट मालक व गाडी चालक आणि ट्रक मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.


अंगद शेषेराव नाईकवाडे (रा. सुलतानपूर, चौसाळा) यांनी चौसाळ्याहून धुळ्याला ट्रक (क्र. एम.एच. 20 सी.टी. 2825) यामध्ये 15 लाखांचे सोयाबीन 5 नोव्हेंबर 2021 रोजी पाठविले होते. सदरील हे सोयाबीन धुळ्याला पोहचलेच नाही. याबाबत व्यापारी अंगद नाईकवाडे यांनी चौकशी केली असता सदरील प्रकरणात फ्रॉड झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत ट्रान्सपोर्ट मालक अर्जुन आसाराम कुडके, ट्रकमालक शेख अख्तर रशीद (रा. गांधीनगर, बीड) व ट्रक चालक शेख जुबेर नजीर (रा. बीड) या तिघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा यांच्या मार्गदर्शनाखाली विलास जाधव हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Most Popular

error: Content is protected !!