Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठवाडामोदी सरकार म्हणजे निजामशाही आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील -खा.राऊत

मोदी सरकार म्हणजे निजामशाही आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील -खा.राऊत


औरंगाबाद (रिपोर्टर)- देशात महागाईचा भस्मासूर तांडव करत आहे. आतापर्यंत महागाईमुळे 17 हजार छोट्या व्यापार्‍यांनी आत्महत्या केल्या. देशातलं मोदी सरकार हे निजामाच्या अत्याचाराचं सरकार आहे. महागाईबद्दल केंद्रातलं मोदी सरकार बोलायला तयार नाही. त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचं काम विरोधी पक्षाने सुरू केलं आहे. मात्र खबरदार आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 2 कोटी तरुणांना प्रत्येक वर्षी नोकरी देऊ म्हणणार्‍या मोदी सरकारच्या धोरणामुळे साडेचार कोटीपेक्षा जास्त तरुणांच्या नोकर्‍या हातातून गेल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले.


ते औरंगाबाद येथे आयोजीत शिवसेनेच्या आक्रोश मेळाव्यात बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, संदीपान घुमरे हे उपस्थित होते. हा मोर्चा औरंगाबादच्या क्रांती चौकातून निघाला. मोर्चामध्ये केेंद्र सरकारच्या धोरणाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. पेट्रोल, डिजेल, गॅस, खाद्यतेल यासह आदी. जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगत खा. संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 2014 चे इंधन भाव आणि आजचे भाव पाहिले तर जमीन-आसमानचा फरक असल्याचे सांगून आजही पेट्रोल-डिझेल शंभरी पार करून आहे. महागाईवर बोलायचं सोडून केंद्र सरकार लोकांचे लक्ष अन्य प्रकरणांकडे वळवत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सातत्याने केंद्र सरकारकडून होत आहे. हे शहर निजामाविरोधात प्रचंड प्रमाणात लढलं. निजामाच्या अत्याचाराविरोधात उभं राहिलं. आताही केंद्रातलं सरकार हे अत्याचारी निजामासारखच असल्याचे सांगत महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे काम विरोधक करत आहेत. दंगली पेटवायच्या आणि सरकार चालवता येत नसल्याचे सांगत राष्ट्रपती राजवट आणण्याची योजना आखायची परंतु याद राखा आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील, असा इशाराच संजय राऊतांनी या वेळी दिला. या मोर्चामध्ये हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. हा मोर्चा म्हणजे केेंद्र सरकारला इशारा असल्याचे त्यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!