Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडएटीएमची अदलाबदल करुन वृध्दाची फसवणूक

एटीएमची अदलाबदल करुन वृध्दाची फसवणूक


बीड (रिपोर्टर)ः- एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आलेल्या वृध्दाच्या एटीएमची अदलाबदल करुन एका भामट्याने त्यांच्या खात्यातून विस हजार रुपये काढल्याची घटना काल घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिभीषण पांडूरंग सिरसट वय-64 वर्षे, रा.पालवण चौक बीड हे पेन्शनचे पैसे काढण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील एक्सीस बँकेच्या एटीएममध्ये आले असता तेथे एक भामटा आला त्यांने हात चालाकी करुन वृध्दाचे एटीएम घेवून त्यांच्या हातात दुसरे एटीएम दिले. त्यानंतर त्या भामट्याने वृध्दाच्या खात्यातून एटीएमद्वारे विस हजार रुपये काढले. या प्रकरणी सिरसट यांनी दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात चोरट्या विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!