Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडधर्मराज जोशी उद्यानात घाणीचे साम्राज्य

धर्मराज जोशी उद्यानात घाणीचे साम्राज्य


न.प.च्या खेळण्या मोडल्या,खासगी खेळण्या मात्र सुरू,डासांचा प्रादुर्भाव वाढला
बीड (रिपोर्टर):- बीड शहरात नगर पालिकेने विविध भागात सात उद्यान उभारले आहे. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जोशी उद्यानात मोठ्या प्रमाणात मुलं संध्याकाळी खेळण्यासाठी येतात. नगर पालिकेच्या वतीने येथे मुलांसाठी खेळण्या ठेवलेल्या होत्या. त्या सर्व खेळण्या मोडल्या आहेत. त्या जागी खासगी लोकांनी खेळण्या ठेवल्या असून त्याला पैसे आकारले जातात. त्या तुलनेत तेथे कसल्याच सुविधा नसून उद्यानात प्रचंड घाण असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येणार्‍या मुलांची येथे गैरसोय होत असून नगर पालिकेने साफसफाई करून मोडलेल्या खेळण्या दुरूस्त करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.


बीड नगर पालिकेच्या वतीने शहरातील साथ उद्यानापैकी एकाही उद्यानाची नियमीत साफसफाई केली जात नाही. त्यामुळे जवळपास सर्वच उद्यानात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक उद्यान मोकाट कुत्र्यांसाठी आणि मद्यपियांचा अड्डा बनले आहे. एकमेव जोशी उद्यानात संध्याकाळी चिमुकल्यांना घेवून पालक विरंगुळासाठी येतात. मात्र तेथे आलेला प्रत्येक जणाची निराशाच होते. गेटवरच तिकीट घेवून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. आतमध्ये गेल्यानंतर सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसते. नगर पालिकेने तेथे ठेवलेल्या सर्वच खेळण्या पुर्णत: मोडलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी खासगी लोकांनी खेळण्या आणून ठेवल्या असून त्याला ते दर आकारतात. तर नगर पालिकेच्या वतीने कसलीच साफसफाई केली जात नाही. सर्व उद्याने बंद असतांना एकमेव सुरू असलेल्या जोशी उद्यानात तरी नगर पालिकेने साफसफाई करून स्वच्छता ठेवावी अशी मागणी येथे आलेल्या प्रत्येकाकडून केली जात आहे.

स्वच्छता नाही तर पैसे कशाचे घेता?
जोशी उद्यानात घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथे आलेल्या चिमुकल्यांसह पालकांची निराशा होते. नगर पालिका येणार्‍या प्रत्येकांकडून तिकीट घेते. मात्र कसल्याच प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळे स्वच्छता नसेल तर नगर पालिका नेमके पैसे कशासाठी घेते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!