Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडअंबाजोगाई बलात्कार प्रकरणी आणखी चौघे अटक

अंबाजोगाई बलात्कार प्रकरणी आणखी चौघे अटक

शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरू;
पिडीतेने स्वरातीत घेतला ३२ वेळा उपचार
अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई बलात्कार प्रकरणात अनेक खुलासे ही बातमी प्रकाशीत करून सायं. दै. बीड रिपोर्टरने दोन दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीसांनी कात टाकत रात्री ४ जणांना ताब्यात घेतले असून अंबाजोगाई शहरातील मुख्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे. मागील ८ महिन्याच्या कालखंडात सदरील पिडीतेने स्वराती रुग्णालयात तब्बल ३२ वेळा उपचार घेतल्याची बाब समोर आली आहे. सदरील पिडीतेवर गेल्या काही महिन्याच्या कालखंडात अनेकांनी अत्याचार केल्याचे बोलले जात असून पोलीसांच्या धडक कारवाईमुळे तिच्यावर अत्याचार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


अंबाजोगाई बलात्कार प्रकरण प्रशासनाने गांभिर्याने घेतले आहे. या प्रकरणात पिडीतेच्या पित्यासह तीन जणांना ताब्यात घेतले होते. मात्र रात्री पुन्हा चार जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये अंबा साखर कारखाना, बनसारोळा, पेडगाव ता.परभणी ह. मु. अंबाजोगाई व अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथून या चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अंबाजोगाई शहरातील मुख्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात झाल्याने सदरील पिडीतेवर अत्याचार करणार्‍या लोकांत धाबे दणाणले आहेत. गेल्या आठ महिन्याच्या कालखंडात सदरील पिडीतेने अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात तब्बल ३२ वेळा उपचार घेतल्याची नोंद पोलीसांना सापडली आहे. या दरम्यानही रुग्णालयातील काहींनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे बोलले जाते. पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!