Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीवडवणी नगरपंचायतीचे आरक्षण जाहिर

वडवणी नगरपंचायतीचे आरक्षण जाहिर

प्रभाग पाचची गोची;आरक्षित वॉर्ड जैसेथे
वडवणी
(रिपोर्टर):- वडवणी नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण सोडत आज जाहिर झाले आहे.यात प्रभाग क्रं.५ मधील इच्छुक उमेदवारांची गोच्छी झाली आसून पहिल्या वेळी आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला प्रभाग सुटला होता.आता यावेळी सदरील प्रभाग मागास प्रवर्ग महिलेला सुटलेला आहे.तर आरक्षित प्रभाग जैसे थेच राहिले आहेत.


वडवणी नगरपंचायत निवडणूक २०२१साठी वॉंर्ड रचना जैसे थेच राहिली आहेत.तर वॉंर्ड निहाय आरक्षण आज सकाळी वडवणी तहसील कार्यालयाच्या प्रगणात जाहिर करण्यात आले आहे.यामध्ये प्रभाग क्रमांक ०१-अनुसुचित खुला, प्रभाग क्रमांक १७- अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक ४,५- नागरिकांचा मागासवर्ग महिला, प्रभाग क्रमांक ६,१३- नागरिकांचा मागासवर्ग खुला, प्रभाग क्रमांक ८,१०,१२,१४,१५ सर्व साधारण महिला, प्रभाग क्रमांक २,९,,३,७- सर्व साधारण खुला असे एकुण १७ प्रभागासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी माजलगांव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून यावेळी तहसिल व नगर पंचायत विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.तर गेल्या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रं.५ हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला होता.म्हणून याठिकाणी शेषेराव जगताप,महादेव जमाले आणि विद्यमान नगरसेवक भानुदास उजगरे असे तिन्ही मातब्बदार यांनी ताकत लावली होती.परंतु आता हा प्रभाग मागास प्रवर्ग महिलेला सुटला असल्याने या तिघांना हि आता दुसऱ्या प्रभागाच्या शोधात रहावे लागणार आहे.हे निश्चित झाले आहे.तर अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण जैसे थेच राहिले आहे.या नविन सोडतीमध्ये कही गम कही खुशी अशी अवस्था पाहवयास मिळाली आहे.

शिरूर कासार नगरपंचायत
वार्डनिहाय आरक्षण

वार्ड क्र.१-ओबीसी, वार्ड क्र.२-ओबीसी, वार्ड क्र.३-सर्वसाधारण, वार्ड क्र.४-सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.५ -सर्वसाधारण, वार्ड क्र.६-सर्वसाधारण, वार्ड क्र.७-सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.८-सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.९-ओबीसी महिला, वार्ड क्र.१० अनुसूचित महिला, वार्ड क्र.११-ओबीसी महिला, वार्ड क्र.१२-सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.१३-सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.१४-अनुसूचित, वार्ड क्र.१५-सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.१६-सर्वसाधारण, वार्ड क्र.१७-सर्वसाधारण

Most Popular

error: Content is protected !!