Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडदेशी-विदेशीसह हातभट्टीवर धाड तिघा जणांना घेतले ताब्यात

देशी-विदेशीसह हातभट्टीवर धाड तिघा जणांना घेतले ताब्यात


बीड (रिपोर्टर)- दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध हातभट्टीसह देशी दारूच्या दुकानावर धाड टाकून दिंद्रुड पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले तर हातभट्टी बनवण्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलगाव येथे कुशावर्ता शामभाऊ राठोड (रा. लोणगाव तांडा) या देशी दारू विकत असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांना मिळाली असता त्या ठिकाणी धाड टाकून देशी दारू जप्त केली. तर आप्पा रघुनाथ आरे यांच्याकडेही देशी दारू मिळून आली. भारत रामेश्वर जाधव हे हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याठिकाणीही धाड टाकण्यात आली. सदरील कारवाई प्रभा पुंडगे, पीएसआय खरात, हवालदार राठोड, पो.कॉ. विशाल मुजमुले यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!