Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडआ.संदिप क्षीरसागर यांनी राजुरी-चिंचपूर रस्त्यासाठी गुत्तेदार व प्रशासनास धरले धारेवर

आ.संदिप क्षीरसागर यांनी राजुरी-चिंचपूर रस्त्यासाठी गुत्तेदार व प्रशासनास धरले धारेवर


तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना; रखडलेले काम सुरू करण्यासाठी माजी जि.प.सदस्य मदन जाधव यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी
बीड (रिपोर्टर)- राजुरी-रायमोहा-चिंचपूर रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून अर्धवट अवस्थेत रखडले असल्याने वाहन धारकांना, नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रखडलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून सदर काम गुणवत्तापुुर्ण जलद गतीने करण्यात यावे अशी मागणी रायमोहाचे माजी जि.प.सदस्य मदन जाधव यांच्यासह या भागातील शिष्टमंडळाने आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे केली होती.

आ.संदिप क्षीरसागर यांनी संबंधित गुत्तेदार व प्रशासनाला सूचना देवूनही काम सुरू केले जात नसल्याने गुत्तेदारास व संबंधित अधिकार्यास चांगलेच धारेवर धरले. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या या कडक भूमिकेनंतर दोन दिवसात काम सुरू करण्यात येईल अशी ग्वाही संबंधित गुत्तेदार व अधिकार्यांनी दिली आहे.
राजुरी-रोयमोहा-चिंचपूर रस्त्याचे काम अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. सदर रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे या भागातील नागरिकांना वाहन घेवून येणे अवघड झाले होते. साधे चालणे ही मुश्किल असून या रस्त्यावरून डिलेव्हरी रूग्ण, साधे रूग्ण यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तात्काळ व जलदगतीने करण्यात यावे अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडे रायमोहाचे माजी जि.प.सदस्य मदन जाधव, राष्ट्रवादीचे नेते रामदास हंगे, पंचायत समिती सदस्य माऊली सानप, चंद्रकांत सस्ते, बाळासाहेब देवकर, संदिपान मिसाळ, संदिप येवले, प्रदिप सानप, हशीम शेख,दत्ता शिंदे, महादेव सदगर, सखाराम गोरे, चंद्रकांत कदम, अ‍ॅड.कृष्णा डोंगरे, शिवाजी मिसाळ, साईनाथ कैतके, सुदर्शन सांगळे, बाळु डिसले. बापुसाहेब येळे आदीनी केली होती. सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा व त्याचा दर्जा आणि गुणवत्ता कायम टिकली पाहिजे. हे लक्षात घेवून काम जलदगतीने पुर्ण करावे अशा सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधित गुत्तेदार यांना दिल्या होत्या. परंतू प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात न आल्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्यासह संबंधित गुत्तेदारास चांगलेच धारेवर धरले. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी धारेवर धरल्यानंतर सदर काम तात्काळ सुरू करण्याच्या हालचाली संबंधित गुत्तेदार व प्रशासनाकडून सुरू केल्या आहेत. येत्या दोन दिवसात सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे असे संबंधित गुत्तेदार व प्रशासनाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर या भागातील नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!