Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडरस्त्यासाठी पांगरी रोडवर शिवसंग्रामचा रस्ता रोको अंबिका चौक ते साक्षाळपिंप्रीपर्यंत रस्ता तात्काळ...

रस्त्यासाठी पांगरी रोडवर शिवसंग्रामचा रस्ता रोको अंबिका चौक ते साक्षाळपिंप्रीपर्यंत रस्ता तात्काळ करा


बीड (रिपोर्टर):- अंबिका चौक ते साक्षाळपिंप्री या दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरावस्था असून रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी शिवसंग्रामच्या वतीने पांगरीरोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अंबिका चौक ते साक्षाळपिंप्री या दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. खराब रस्त्यामुळे ववाहन धारकांना मणक्याचे त्रास होवू लागले. रस्ता दुरूस्त करण्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असून रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज शिवसंग्रामच्या वतीने पांगरी रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रामहरी मेटे, लक्ष्मण ढवळे, अनिल घुमरे, प्रशांत डोरले, मुकुंद गोरे, अशोक लोकरे, सुनिल शिंदे, सुरेश बावळे, शैलेश सुरवसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. र

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!