Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडमताचा हक्क सांगण्यासाठी राधाबिनोदांची ग्रामसभा, मतदानाचे पटवून दिले महत्व, ग्रामस्थांच्या अन्य...

मताचा हक्क सांगण्यासाठी राधाबिनोदांची ग्रामसभा, मतदानाचे पटवून दिले महत्व, ग्रामस्थांच्या अन्य समस्यांवरही केली चर्चा


जिल्हाधिकार्‍यांनी चर्‍हाट्यात घेतली ग्रामसभा;, मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी केले आवाहन
बीड (रिपोर्टर)-महसूलमधील अधिकार्‍यांनी ग्रामसभेला उपस्थिती लावलेले ऐकिवात आहे मात्र जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी स्वत: चर्‍हाटा येथील विशेष ग्रामसभेला उपस्थिती लावत ग्रामस्थांसह प्रशासनाला काही सूचना केल्या. ग्रामपंचायत पातळीवर राबवण्यात येणार्‍या योजनांचीही माहिती घेतली. स्वत: जिल्हाधिकार्‍यांनी या ग्रामसभेला उपस्थिती लावल्याने महसूलसह ग्रामसेवक आणि सरपंच यांनीही ग्रामपंचायत पातळीवरच्या योजना गांभीर्याने राबविण्यासोबत चालू असलेली मतदार नोंदणीही शंभर टक्के करण्याचेही या वेळी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले.


1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान मतदार नोंदणीसह मतदार पुनरनिरीक्षण कार्यक्रम आयोगाने घोषीत केेला आहे. या कार्यक्रमातंर्गत मतदाराला मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, मतदार यादीत चुकलेले नाव दुरुस्त करणे, नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे यासाठी आयोगाने हा विशेष कार्यक्रम घोषीत केेला आहे. हा कार्यक्रम घोषीत करताना महसूल विभागातील अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक आणि तलाठींना विशेष ग्रामसभा आयोजीत करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी स्वत:च बीड तालुक्यातील चर्‍हाटा या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेला उपस्थिती लावण्याचा निर्णय रात्री घेतल्यानंतर आज सकाळी स्वत: ते जातीने या ग्रामसभेला उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी स्वत: उपस्थित राहिल्यामुळे ग्रामस्थात मोठा उत्साह होता.
त्यामुळे कधी नव्हे ते या ठिकाणच्या ग्रामसभेला गावातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सुरुवातीला जिल्हाधिकारी शर्मा यांनी मतदार यादीच्या कार्यक्रमाबाबत ग्रामस्थांना माहिती दिली व मतदार यादीत नाव दुरुस्त करून घेण्याचे आवाहन करून ग्रामपंचायत पातळीवर राबवण्यात येणार्‍या विविध योजनांचा आढावा या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. आवश्यक त्या ठिकाणी तलाठी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना सूचना दिल्या. ग्रामपंचायत पातळीवरील वित्त आयोगातून काही नवीन कामे घेण्याचेही या वेळी सरपंच आणि ग्रामसेवकांना त्यांनी या वेळी सूचीत केले. ग्रामसभा घेतल्यानंतर या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन आतापर्यंत ग्रामस्थांनी आणि या आरोग्य केंद्राच्या परिसरातील गावातील लोकांनी किती प्रमाणात कोविड लसीकरण झाले याचीही माहिती घेतली. जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: या ग्रामसभेला उपस्थिती लावल्याने महसूलसह ग्रामविकास विभागाचे प्रशासन मात्र रात्रीपासून अलर्ट झाले होते. या ग्रामसभेला उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार, ग्रामसेविका श्रीमती मोनिका वसू या उपस्थित होत्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!