Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईवेडे लोकं बरळत असतात

वेडे लोकं बरळत असतात


ते नेमक्या कोणत्या नशेत बरळत असतात याचा तपास एनसीबीने करावा -संजय राऊत
मुंबई (रिपोर्टर)- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली आहे. भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होती असे वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. तसेच देशाला खरे स्वातंत्र्य हे 2014 ला मिळाले असल्याचे म्हणत तिने मोदी सरकारवर स्तुती सुमने उधळली होती. यानंतर तिच्यावर प्रचंड टीका झाली. यानंतर तिने पुन्हा एकदा महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरुन संजय राऊतांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. वेडे लोकं बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा तपास एनसीबीने करावा असा निशाणा राऊतांनी साधला आहे.


संजय राऊत अभिनेत्री कंगनाविषयी बोलताना म्हणाले की, ’वेडे लोकं हे बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेमध्ये असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोणाकडून केला जातो? एनसीबीने त्याचा तपास करायला हवा.’ असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

Most Popular

error: Content is protected !!