Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडवाढीव टिकीट व गाड्या भरण्यावरुन बसस्थानकात होवू लागला वाद सकाळी पोलीस आले...

वाढीव टिकीट व गाड्या भरण्यावरुन बसस्थानकात होवू लागला वाद सकाळी पोलीस आले होते घटनास्थळी

बीड (रिपोर्टर)ः- गेल्या काही दिवसापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होवू लागली. राज्य सरकारने खासगी वाहन धारकांना वाहतूक करण्याची परवानगी दिल्यामुळे बीडच्या बसस्थानकात मोठी वर्दळ निर्माण झाली. वाहन चालक प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेऊ लागले. तिकिटाच्या दरावरून आणि गाड्या भरण्यावरून आज सकाळी बसस्थानकात वाद निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी येऊन वाद मिटवला.


एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला असून हा संप अद्यापही मिटलेला नाही. संपामुळे वाहन धारकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. राज्य सरकारने खासगी वाहनांना परवानगी दिल्यानंतर बीड बसस्थानकात दररोज अनेक वाहने उभी राहतात. वाहनधारक प्रवाशांकडून जास्तीचे तिकिट घेऊ लागल्याने यावरून वादावादी निर्माण होऊ लागली. सकाळी गाड्या भरण्यावरून आणि वाढवलेल्या तिकिट दरावरून काही गाडी चालक व प्रवाश्यात वाद निर्माण झाला होता. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदरील हा वाद मिटवला असल्याचे कळते.

Most Popular

error: Content is protected !!