Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडचोरी प्रकरणातील आरोपी 12 तासात जेरबंद आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल

चोरी प्रकरणातील आरोपी 12 तासात जेरबंद आरोपीकडून हस्तगत केलेला मुद्देमाल


बीड (रिपोर्टर)ः- बीड शहरातील बालेपीर भागामध्ये परवा दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलीसांनी छडा लावला असून बारा तासात एका आरोपीला अटक केली. या आरोपीकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेख रजिया जिलानी रा.बालेपीर या बाहेर गेल्याने याच संधीचा फायदा उचलून चोरट्याने त्यांच्या घरात चोरी केली होती. यामध्ये सोन्याच्या दागीन्यासह नगदी रक्कम लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी शेख रजिया यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. बारा तासात पोलीसांनी चोरी प्रकरणातील आरोपी शेख जिशान शेख रियाज वय-19 वर्षे रा.नुरानी मस्जीद जवळ अमराई बालेपीर याला ताब्यात घेतले. याच्याकडून काही मुद्दे माल जप्त करण्यात आला. हि कारवाई पिआय साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय शेजुळ,पिएसआय दराडे, पोलीस नाईक शेख, चव्हाण, काळे यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!