दुचाकी रॅलीने वेधले लक्ष, परभणी फाटा रोखला तिन तास
माजलगाव (रिपोर्टर): धनगर समाज अनूसूचित जमाती एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखपट्टणम परभणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन दि. 11 ऑक्टबरपर्यंत रोजी करण्यात आले. दरम्यान दुचाकी रॅलीने शहवासीयांचे लक्ष वेधले.
राज्यातील धनगर समाजाला अनूसुचित जमाती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज हा मागील पन्नास वर्षांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे परंतु शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आरक्षणाची अमलबजावी करावी या मागणीसाठी माजलगाव येथील वसंतराव नाईक चौक परभणी चौफाळा येथे राष्ट्रीय महामार्ग कल्याण – विशाखापट्टणमवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.