Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीड98 पदवीधर शिक्षकांना केंद्र प्रमुखांचा पदभार मिळणार

98 पदवीधर शिक्षकांना केंद्र प्रमुखांचा पदभार मिळणार


बीड (रिपोर्टर):
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये 98 केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. राज्य सरकारकडून या संवर्गात अद्याप बढती करण्यास परवानगी मिळालेली नाही. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही पदे रिक्त असल्याने अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शिक्षकांचे प्रशासकीय कामे खोळंबतात. ही बाब लक्षात घेवून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी 98 केंद्रप्रमुखांसाठी पदवीधर शिक्षकातून या पदावर नियूक्क्त करण्याचा निर्णय घेतला.

येथील सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहामध्ये प्रत्येक केंद्रातून तीन पदवीधर शिक्षकांना शिक्षण विभागाच्या वतीने बोलावण्यात आले. या तीन शिक्षकांपैकी ज्यांची पात्रता उच्च आहे, ज्यांची सिनिअरिटी जास्त आहे व जे पदभार घेण्यात इच्छूक आहेत त्यापैकी एका शिक्षकाकडे केंद्रप्रमुखाचा पदभार देण्यात येणार आहे. याबाबतची समायोजनाची प्रक्रिया सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.आंबेडकर सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण विभागाकडून पार पाडण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे आणि शिक्षण विस्तार अधिकारी चोपडे यांच्याकडून ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!