Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडखराब रस्त्याने कंबर लचकले, तरुणांचे माथे भडकले

खराब रस्त्याने कंबर लचकले, तरुणांचे माथे भडकले


बीड-जवळा-पिंपळनेर रस्त्यासाठी मंगळवारी कलेक्टर कचेरीवर आंदोलन, रस्ता न झाल्यास जि.प., पं.स. निवडणुकीवर बहिष्कार
बीड (रिपोर्टर)ः- ज्या भागामध्ये माजी मंत्र्यांची जिनींग आहे, ज्या सर्कलमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहे. जिथे राष्ट्रवादी किसान सेनेचे, शिवसेना किसान सेनेचे जिल्हा प्रमुखांचे वास्तव्य आहे. वेगवेगळ्या पक्षातील मात्तबर ज्या रस्त्याने ये-जा करतात तो बीड-नागापूर -जवळा-पिंपळनेर या रस्त्याची दुर्देशा गेल्या कित्येक महिन्यापासून झाल्याने अनेक अपघाताबरोबर प्रवाशांना बाईक स्वारांना पाठीच्या मनक्याचे आजार सुरू झाल्याने संतापलेल्या या परिसरातील तरुणांनी आज एकत्रीत येवून रस्त्याच्या मागणीसाठी शासन प्रशासन विरोधात निदर्शने करण्या बरोबर येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.


बीड-नागापूर-जवळा-पिंपळनेर रस्त्याची दुर्दशा गेल्या कित्येक महिन्यापासून झाली आहे. रस्त्यावर जिथे तिथे खड्डेच खड्डे असल्याने वाहन चालकांसह वाहनात बसलेल्या प्रवाशांनाही याचा त्रास होतो. अवघ्या 10 ते 23 कि.मी.चे अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना एक ते दिड तास लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठी वाहतूक असून बीडसाठी शेकडो गावांना जोडणारा हा रस्ता आहे. सदरचा रस्ता दुरूस्त करण्यात यावा यासाठी शासन प्रशासन व्यवस्थेला निवेदन दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केलं जातं. हा रस्ता दोन विधान सभा आमदारांच्या नेतृत्वात आहे. या भागात दोन आमदार नेतृत्व करतात. या रस्त्यावर असणार्‍या गावांमध्ये विविध पक्षांचे जिल्हाप्रमुख आजी-माजी लोकप्रमुख असतांना या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. म्हणून संतापलेल्या या भागातील तरुणांनी आज सिध्दीविनायक पेट्रोल पंपाजवळ एक बैठक घेतली. या बैठकीला या रस्त्यावरील शेकडो गावच्या तरुणांनी उपस्थिती नोंदवली होती. सदरच्या रस्त्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.येत्या काही दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर या परिसरातील शेकडो गावे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे या बैठकीत निर्णय झाला. बैठकीमध्ये ज्या भागातील शेकडो गावचे तरुण उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!