Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडरान डुकरांच्या बंदोबस्तासाठी कुंपनात विजेचा प्रवाह दोन शेतकर्‍यांचा शॉक लागून मृत्यू

रान डुकरांच्या बंदोबस्तासाठी कुंपनात विजेचा प्रवाह दोन शेतकर्‍यांचा शॉक लागून मृत्यू


पाटोदा (रिपोर्टर)- रान डुकरांच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात शेतकर्‍याने वीज सोडली असता संबंधित शेतकर्‍याच्या शेजारच्या शेतकर्‍याला याची मोठी किंमत मोजावी लागली असून विजेचा प्रवाह असलेल्या तारेला हात लागल्याने एका शेतकर्‍याला शॉक लागला असता त्याचा भाऊ त्याच्या मदतीला धावला मात्र दुर्दैवाने दोघांनाही विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे घडली.

पाटोदा तालुक्यातील शेतकर्‍यांना रान डुकरांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा प्रशासन दरबारी शेतकर्‍यांनी सांगूनही प्रशासन व्यवस्था याकडे दुर्लक्ष करते म्हणून या भागातील शेतकरी रान डुकरांच्या बंदोबस्तासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. नाळवंडी येथील रवि ढोले यांनी आपल्या शेतातील कुंपनाला रान डुकरांपासून बचाव करण्यासाठी विजेचा प्रवाह सोडला होता. रात्री त्यांच्या शेजारचे शेतकरी हुसेन फकीरभाई शेख यांचा त्या तारेला हात लागला. त्याचवेळी त्यांचे बंधू जाफर फकीरभाई शेख हे त्यांना सोडण्यासाठी त्याठिकाणी गेले मात्र त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दुर्घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!