Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईगोठ्यात बांधलेल्या शेळ्याचंी चोरी

गोठ्यात बांधलेल्या शेळ्याचंी चोरी


गेवराई (रिपोर्टर):- घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्या आणि दोन बोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील बागपिंपळगाव कॅम्प येथे घडली. या प्रकरणी शेतकर्‍याच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर अंकुश कांबळे या शेतकर्‍याने बागपिंपळगाव येथील स्वत:च्या घरासमोरील गोठ्यात चार शेळ्यात आणि दोन बोकडे बांधले होते. काल पहाटे अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले. या प्रकरणी शेतकर्‍याने तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याचा शोध गेवराई पोलीस घेत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!