Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडशिवणी येथील देशपातळीवरील दुसर्‍या बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ

शिवणी येथील देशपातळीवरील दुसर्‍या बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ


बीड (रिपोर्टर)-माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या कालखंडामध्ये कर्मकांडांना दूर सारण्यासाठी विज्ञानवादी दृष्टी आणण्यासाठी बौद्ध धम्म परिषद देशपातळीवर काम करत आहे. जगाच्या पाठीवर मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. त्या धर्माचे श्रध्देने संगोपन व्हावे ही भूमिका धम्म परिषदेची असल्याचे सांगून देशपातळीवरील दुसर्‍या बौद्ध धम्म परिषदेला आज बीड जिल्ह्यातील शिवणी येथे सुरुवात झाली.

गेल्या पंधरा दिवसांपासून शिवणी येथे होत असलेल्या बौद्ध धम्म परिषदेसाठी बौद्ध भिख्कू धम्मशील आणि आम्रपाली सेवाभावी संस्थेच्या वतीने याचे नियोजन करण्यात आलेले आहे. बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे. त्यामुळे या धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आम्ही काम करत आहोत. शिवणी हे एक बौद्ध धर्माचे वारसा लाभलेले गाव आहे. 1977 साली याठिकाणी डॉ. आनंद कौशल्य या बौद्ध धर्म गुरुंनी 25 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये अनेक जणांना बौद्ध धर्माचे महत्व पटवून देऊन त्याची दिक्षा दिलेली आहे. त्यामुळे दुसर्‍या धम्म परिषदेसाठी हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव निवडण्यात आलेले आहे. याचे उद्घाटन अमेरिकेतील बौद्ध धम्म प्रसारक पु.लांबा रंगड्रोलो यांच्या हस्ते या धम्म परिषदेचे उद्घाटन होणार असून याचे अध्यक्षस्थानी मुंबईतील बौद्ध धम्म गुरू पंडित भिख्कू इंद्रवेल हे राहणार आहेत. शिवणी येथे तीन एकर जागेमध्ये विपश्‍नाकेंद्र, वृद्धाश्रम, वाचनालय आदी सुविधा उभा करण्यात येत आहेत. त्यामुळे या बौद्ध धम्म परिषदेमध्ये मोठ्या संख्येने लोकांसोबतच धम्म उपासकांनी उपस्थित राहावे, सोबत धम्म परिषदेच्या प्रारंभी आज सकाळी 9 वाजता उपासक आणि उपासिका भव्य प्रभात फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बीड येथील डॉ. आंबेडकर सामाजिक भवन येथे समारंभ होऊन या भव्य धम्म परिषदेला सुरुवात झाली.

Most Popular

error: Content is protected !!