Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeराशी भविष्यपीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची संजय...

पीएम केअर फंडात बेहिशोबी पैसे पडून मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची संजय राऊतांची मागणी

मुंबई (रिपोर्टर) शेतकर्‍यांच्या जिद्दीपुढे अखेर मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांनी देशाला 18 मिनिटांच्या भाषणात ही मोठी घोषणा केली होती. शेतकर्‍यांच्या हिताचा हा कायदा सरकारने चांगल्या हेतूने आणला होता, मात्र काही शेतकर्‍यांना पटवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर आता शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ही मागणी योग्य असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी मदत करावी असे म्हटले आहे.
शेतकर्‍यांना मदत द्यावी अशी देशभरातून मागणी होत आहे. कारण गेल्या दीड वर्षामध्ये 700च्या आसपास शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व तीन कृषी कायद्यांच्या विरोधात लढत होते. पंतप्रधानांनी हे कायदे मागे घेतले. सरकारला आपली चूक समजली पण या चुकीच्या निर्णयाचे बळी शेतकरी आहेत.

Most Popular

error: Content is protected !!