Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडइन कॅमेरा शिक्षक पात्रता चाचणी परिक्षा सुरू

इन कॅमेरा शिक्षक पात्रता चाचणी परिक्षा सुरू


बीड (रिपोर्टर)ः- पोलीस बंदोबस्तात आणि इन कॅमेरा शिक्षक पात्रता परिक्षा (टि.ई.टी.) शहरातील विस केंद्रावर सुरू झाले आहे. दोन्ही सत्रामध्ये मिळवून 8500 विद्यार्थी शिक्षक पात्रता परिक्षा देत आहे. या परिक्षेसाठी परिक्षाकेंद्राच्या भोवती मोठा पोलीस बंदोबस्त पोलीसांनी तैनात केला असून या परिक्षेत काही गैरप्रकार होवू नये म्हणून इन कॅमेरा ही परिक्षा सुरू आहे.
तब्बल तिन ते चार वर्षाच्या कालखंडानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यासाठी मुहूर्त लावला. तब्बल तिन वेळा या परिक्षेच्या तारखा पुढे ढकलत ढकलत प्रत्यक्ष परिक्षा घेण्यासाठी आजचा मुहूर्त शिक्षण विभागाला सापडला.  सकाळी 20 दुपारी 16 अशा केंद्रावर ही परिक्षा घेण्यात येत आहे. सकाळच्या सत्रामध्ये प्राथमीक शिक्षक व प्राथमीक पदवीधर शिक्षक या पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे. त्यांच्यासाठी ही परिक्षा होत असून दुपारच्या सत्रात माध्यमीक शिक्षक पदासाठी ही परिक्षा घेण्यात येणार आहे. महसूल आणि शिक्षण विभागाचे या परिक्षेवर नियत्रण असून ही परिक्षा शांततेत आणि पारदर्शक पार पडावी म्हणून प्राथमीक विभागाचे शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, आणि माध्यमीक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक यांची परिक्षेसाठी नियोजनबध्द निगरानी आहे.

Most Popular

error: Content is protected !!