Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईएअर इंडिया, रेल्वे विकणाऱ्यांना एसटी संपावर बोलण्याचा अधिकारी नाही; बाळासाहेब थोरात यांचा...

एअर इंडिया, रेल्वे विकणाऱ्यांना एसटी संपावर बोलण्याचा अधिकारी नाही; बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल


मुंबई (रिपोर्टर) ज्यांनी एअर इंडिया विकली तसेच रेल्वे विकायला निघाले होते त्यांनी एसटीवर बोलू नये. त्यांना याविषयी बोलण्याचा अजिबात अधिकारी नाही असा हल्लाबोल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केला आहे. नगरमध्ये आज ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपातून तोडगा काढण्याचा परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहेत. एसटी कामगारांच्या हिताची आम्ही जपवणूक करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहे त्यामुळे परिवहन मंत्री याप्रकरणात लक्ष घालत आहेत. त्यावर काही ना काही तोडगा निघेल असे थोरात म्हणाले. पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही जण एसटी कामगारांचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे उघड आहे. ते सर्वांनाच दिसत आहेत असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

…यामुळे विक्रम गोखलेंचे विधान

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि कंगणा रनोटवर देखील टीका आहे. कंगना रनोट काय बोलते? स्वातंत्र्याबाबत बोलण्याची तिची लायकी तरी आहे का? कंगनाचे बोलणे चुकीचे आहे. वादग्रस्त बोलते आणि संरक्षण मिळवते. पद्मश्रीही मिळतो. कंगनाला मिळालेला पद्मश्री आणि संरक्षण पाहून विक्रम गोखलेही बोलायला लागले आहेत. त्यांनाही पद्मश्री मिळून जाईल, असा चिमटा यांनी काढला.

Most Popular

error: Content is protected !!