Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या पावणे सहा लाखांवर 12 लाख 56...

जिल्ह्यात दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या पावणे सहा लाखांवर 12 लाख 56 हजार 210 नागरिकांनी घेतला पहिला डोस


बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड-19 प्रतिबंधक लस शासनाकडून मोफत दिली जात आहे. बीड जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह ग्रामीण भागातील रुग्णालयात लस दिली जात असून आतापर्यंत जिल्हाभरात पहिला डोस 12 लाख 56 हजार 210 नागरिकांनी घेतला असून दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या मात्र कमी दिसून येत आहे. 5 लाख 70 हजार 185 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
16 जानेवारी 2021 पासून देशभरामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. बीड जिल्ह्यात पहिला डोस घेणार्‍यांची संख्या 12 लाख 56 हजार 210 इतकी आहे.मात्र दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. 5 लाक 70 हजार 185 नागरिकांनीच दुसरा डोस घेतलेला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर बहुतांश नागरिक दुसरा डोस घेण्याकडे टाळाटाळ करत असल्यामुळेच दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने म्हटले आहे. बहुतांश नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. अज्ञान किवा चुकीच्या प्रचारामुळे काही नागरिक लस घेत नाहीत. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रामध्ये कोविडची मोफत लस उपलब्द करण्यात आलेली आहे. तसेच काही गावांमध्ये जावून आरोग्य विभागाच्या वतीने कॅम्पसुद्धा घेतले जात आहेत. जिल्ह्यात जास्तीत जास्त लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्न केले जात आहेत.

Most Popular

error: Content is protected !!