Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीनरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आ. सुरेश धस यांचा खडा पहारा

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आ. सुरेश धस यांचा खडा पहारा


आष्टी (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यातील किन्ही गावात बिबट्याने हौदोस घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत तीन जण ठार झाले. या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक व अधिकार्‍यांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी रात्री बिबट्याला पकडण्यासाठी रात्रभर वन विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर किन्ही गावात खडा पहारा दिला.

u4


आष्टी तालुक्यातील किन्ही गावात शुक्रवारी दुपारी बारा वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेत ठार केले. चार दिवसांपूर्वी तालुक्यातील सुरूडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाला होता. काल शुक्रवारी दुपारी एक वाजता किन्ही येथे बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षांचा बालक ठार झाला. किन्ही येथे आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पुणे, अमरावती, औरंगाबाद येथून शुक्रवारी रात्री एकशे वीस जणांचा ताफा गावात आला. माहिती मिळताच भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी सर्व अधिकारी कर्मचा-यांसाठी आष्टीवरून जेवण आणले. यानंतर सुरेश धस यांनी अधिकार्‍यांसोबत बिबट्याच्या शोधात रात्री उशिरापर्यंत खडा पहारा दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, भारत मुरकूटे, विजय धोंडे, योगेश कदम, प्रविण पोकळे, किन्ही गावचे सरपंच राहूल काकडे यांच्यासह आदी उपस्थित होते

Most Popular

error: Content is protected !!