Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमुस्लिम आरक्षणासाठी ‘वंचित’चे आंदोलन

मुस्लिम आरक्षणासाठी ‘वंचित’चे आंदोलन


बीड (रिपोर्टर)- मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अशोक हिंगे, बबन वडमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.

मोहम्म पैगंबर बिल व मुस्लिम अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचितचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, बबन वडमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी वंचितचे अनेक कार्यकर्ते उपस्तित होते. मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासह इतर घोषणांनी जिल्हा-धिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.

Most Popular

error: Content is protected !!