Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeसंपादकीयएनसीबीचं तोंड फुटलं

एनसीबीचं तोंड फुटलं


एनसीबीने कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली. या धाडीत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान व इतर काही तरुणांना अटक केली. ही कारवाई समीर वानखेडे यांनी केली. या कारवाईमुळे राज्यातच नव्हे देशात खळबळ उडाली होती. तरुण पिढी विशेष करुन बड्या बापांची पोरं कसे वागतात, याची जोरदार चर्चा सुरु झाली. या कारवाईचे एक,एक धागे उलघडायला लागल्यापासून हे प्रकरण किती गंभीर व गुंतागुंतीचं आहे हे समोर येवू लागलं. ज्या अधिकार्‍याने ही कारवाई केली, तो अधिकारी समीर वानखेडे आहे. या कारवाई बाबत वानखेडे यांची अनेकांनी पाठ थोपटली होती. त्यांना शब्बासकी देण्याचे काम काहींनी केले होते, पण ही जी कारवाई वानखेडे यांनी केली ती किती खरी आणि किती खोटी याचा जबरदस्त पर्दाफाश करण्याचं काम राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांनी केले.


समीर वानखेडे हा अधिकारी किती बनावटी आहे. याचे रोजच खुलासे मलीक करत होते. मलीक यांनी वानखेडे यांची पुर्णच कुंडली बाहेर काढली. आपल्याला हे प्रकरण इतकं महागात जाईल याचा विचार कधी वानखेडे यांनी केलं नव्हता, पण ते महागात गेलं. ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी कारवाई करुन वानखेडे यांनी उगीच हिरोगिरी केली, यावेळी वानखेडे यांना हिरोगिरी पुर्णंता महागात पडली. वानखेडे यांना काहींनी समर्थन दिलं. विशेष करुन भाजपाच्या लोकांनी त्यांना पाठबळ दिलं, पण जसचं वानखेडे यांचं पुर्णंता वस्त्रहरण होवू लागलं. वानखेडे यांची चुकच होती असं समोर येेताच भाजपाने त्यांची साथ सोडून दिली. वानखेडे यांनी कारवाई योग्य असल्याचे दाखवून दिले पण त्यांना खरेपणा दाखवता आला नाही, काहींना सोबत घेवून आपणच कसे धुतल्या तांदळा सारखे आहोत, असा ही प्रयत्न त्यांनी केला, पण त्यात त्यांना यश आलं. वानखेडे यांनी जशी चुकीची कारवाई करुन राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तसा त्यांचा आज पर्यंतचा प्रवास ही तितका काहींसा वेगळा असल्याचे समोर आलं. त्यांनी बदललेली जात, त्यांच्या नावावर असलेलं बारचं लायसन्स, व अन्य काही ‘कौटुंबिक कुटाणे’ याचा पर्दाफाश झाला आहे. वानखेडे यांनी आर्यन खानवर जी कारवाई केली, ती निव्वळ खंडणी उखळण्यासाठी केली असल्याचे मंत्री मलीक यांनी म्हटलेले आहे. त्यांच्या बोलण्यात काही प्रमाणात तथ्य ही असू शकतं, कारण ज्या वेळी कारवाई झाली, त्यावेळी त्या ठिकाणी पोलिस व्यतिरिक्त दुसरे लोक कसे काय होते? त्यांना कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? यासह अन्य संशयास्पद प्रकरण राज्याच्या समोर आलेले आहे. त्यामुळे वानखेडे हे पुर्णंता दोषी असल्याचे दिसून येवू लागले. मलीक यांच्या जावायावर कारवाई केली म्हणुन त्यांनी हे सगळं केलं असल्याचं काहींचं म्हणणं आहे, पण मलीक यांच्या जावायावरही चुकीची आणि जाणीवपुर्वक कारवाई केल्याचे मलीक यांचे म्हणणे आहे. तसे दावे आणि पुरावे त्यांनी सादर केले आहेत. त्यांच्या जावायाकडे ड्रग्स सापडलेच नाही, सुगंधी तंबाखू सापडली असे मलीक यांनी म्हटलेले आहे. अशा किती तरी कारवाया वानखेडे यांनी बोगस पध्दतीने केल्या आहेत, असं मलीक यांनी यापुर्वी सागितलेलं आहे. मलीक यांच्या बोलण्यात दम आहे. त्यांनी वानखेडे यांच्या प्रकरणात पुरावे समोर आणलेले आहेत. सुशांतसिंग प्रकरणात वानखेडे चर्चेत होते. त्यावेळी त्यांनी काही अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलावून परेशान केलं होतं. वानखेडे हे राजकीय बाहुले आहेत, असंच वाटू लागलं. आर्यन खान प्रकरणात कोर्टाने एनसीबीला चांगला झटका दिला. आर्यानच्या बाबतीत कुठले ही पुरावे एनसीबीला सादर करता आले, त्यामुळे कोर्टाने कुठलेही कटकारस्थान रचल्याचे स्पष्ट होत नाही असं म्हटलं आहे. एनसीबीने कारवाई केली ती कुठल्या आधारावर केली. आर्यानने ड्रग्ज घेतले होते तर मग त्याचे मेडीकल का केले नाही, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ड्रग्ज बाबतचे कुठले ही ठोस पुरावे एनसीबी दाखल करु शकली नाही. याचाच अर्थ ही कारवाई बोगस आहे हे सिध्द होवू लागलं. जर या प्रकरणाचा छडा मलीक यांनी खोलात जावून लावला नसता, तर नक्कीच वानखेडे यांनी चुकीच्या पध्दतीने आर्यन व त्याच्या साथीदाराला अडकवलं असतं. पोलिस अधिकारी रक्षणासाठी असतात, की अशा पध्दतीने भक्षन करण्यासाठी? एखादा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी पण कुठल्यातरी द्वेषातून कारवाई करणं हे काही शौर्य नाही, हा निलाजरेपणा आहे. असे निलाजरेपणा करणारे अधिकारी सेवेत असेल तर सर्वसामान्यांना काय न्याय मिळेल? अशा चुकीच्या कारवाया होवू याची दखल घेतली पाहिजे. उगीच कुठल्या तरी प्रकरणात एखाद्याला आयुष्यातून उठवणं काही योग्य नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!