Home Uncategorized धक्कादायक : सकाळी सत्यनारायण पूजा दुपारी 3 वाजता नवरदेवाने केली आत्महत्या; दोन...

धक्कादायक : सकाळी सत्यनारायण पूजा दुपारी 3 वाजता नवरदेवाने केली आत्महत्या; दोन दिवसांपूर्वी झाले होते लग्न

दोन दिवसांपूर्वी झाले होते लग्न

बीड : रिपोर्टर

दोन दिवसांपूर्वी (शनिवारी) थाटामाटात लग्न झाल्यानंतर आज दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी सत्यनारायण पुजा झाल्यानंतर जेवण करून रानात गेलेल्या नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नित्रूड येथे घडली आहे.

पांडुरंग रामकिशन डाके (वय. 24 वर्ष, व्यवसाय किराणा दुकन रा. नित्रूड) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. डाके याने आज दुपारी 3 वाजता स्वताच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाचे लग्न 20/11/2021 रोजी झाले होते. आज दि. 22 नोव्हेंबर रोजी त्याच्या घरी सत्यनारायणचा कार्यक्रम सुरू असताना शेतात जाऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेन नित्रूड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नवरदेवाने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र समजू शकले नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version