Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडप्रेमी युगुलाला माजलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रेमी युगुलाला माजलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात


बीड (रिपोर्टर)- मध्य प्रदेश येथील एका 34 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणल्याची घटना घडली होती. त्या मुलीचा शोध घेत मध्य प्रदेशचे पोलीस माजलगावात दाखल झाले. तेथून माजलगाव पोलिसांच्या मदतीने त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन दोघांनाही पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले.


सादेक सय्यद खान (वय 34, रा. मोरझडी ता. खिडक्या जि. हादी, मध्य प्रदेश) याने त्याच्या गावातीलच एका 17 वर्षीय मुलीला फूस लावून माजलगावला आणले होते. येथील पीएस कॉटन जिनिंगमध्ये ते दोघेही काम करत होते. या प्रकरणी मध्य प्रदेश येथील पिचावाडा पोलीस ठाण्यात कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. मध्य प्रदेश पोलीस मुलीचा शोध घेत माजलगावला आले. काल रात्री त्यांनी माजलगाव पोलिसांच्या मदतीने त्या जोडप्याचा शोध घेऊन त्यांना सकाळी ताब्यात घेतले. ही कारवाई माजलगाव पोलीस ठाण्याचे पो.कॉ. भागवत शेलार आणि पिचावाडा पोलिसांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!