Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमबेपत्ता मुलीच्या आईचा आयजींसमोर टाहो, म्हणाली, दीड महिन्यापासून मुलगी बेपत्ता, आरोपीचं नाव...

बेपत्ता मुलीच्या आईचा आयजींसमोर टाहो, म्हणाली, दीड महिन्यापासून मुलगी बेपत्ता, आरोपीचं नाव देवुनही पोलीस शोध घेत नाहीतबीड (रिपोर्टर)- दीड महिन्यापुर्वी माझ्या अल्पवयीन मुलीला एका मुलाने फुस लावून पळवून नेले, त्या मुलाचे नाव मी शिवाजी नगर पोलीसांना दिले आहे. यासंदर्भात गुन्हाही दाखल करून घेतला आहे मात्र अद्यापपर्यंतही माझ्या मुलीचा शोध लागला नाही. पोलीस मला उडवाउडवीची उत्तरे देतात. मी एसपींनाही भेटले तरी देखील माझ्या मुलीचा शोध लागला नाही. लवकरात लवकर माझ्या मुलीचा शोध लावावा, अशी कैफियत थेट आयजींसमोर मुलीच्या आईने मांडली.


औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्नकुमार यांनी काल शांतता कमिटीची बैठक घेतली. या वेळी अनेकांनी आपल्या तक्रारी आणि सूचना आयजींना सांगितल्या. या वेळी शिवाजीनगर पोलीस घटनेचा व्यवस्थीत तपास करत नसल्याचे एका महिलेने सांगत दीड महिन्यापुर्वी माझ्या सोळा वर्षीय मुलीला एका तरुणाने फुस लावून पळवून नेले आहे. त्याचे नाव, गाव, फोटोही मी शिवाजीनगर पोलीसांना दिले आहे. मात्र तरी देखील पोलिस शोध घेत नाहीत. दीड महिन्यापासून माझ्या मुलीचा तपास लागत नाही. मी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले तर मला उडवाउडवीची उत्तरे दिले जातात. माझी मुलगी अल्पवयीन आहे. तिचा शोध घेऊन मला न्याय द्यावा, असे म्हणत आयजींसमोर मुलीची आई ढसाढसा रडली.

Most Popular

error: Content is protected !!