Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमआयजींकडून बीड जिल्हा पोलिस दलाचा वार्षीक आढावा, अंबाजोगाई बलात्कार प्रकरण, वडवणी एपीआय...

आयजींकडून बीड जिल्हा पोलिस दलाचा वार्षीक आढावा, अंबाजोगाई बलात्कार प्रकरण, वडवणी एपीआय मिरकर प्रकरणासह संमृधी जिवन घोटाळ्यात आयजींनी घातले लक्ष


बीड । रिपोर्टर
अंबाजोगाई बलात्कार प्रकरणात बीड पोलिस तपास करत आहेत. त्यामध्ये दोषी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. आतापार्यंत या प्रकरणात पोलिसांकडून कोणालाही ‘क्लिन चिट’ देण्यात आली नाही. याच बरोबर वडवणी एपीआय मिरकर प्रकरण आणि संमृधी जिवन घोटाळ्याचाही आयजींनी आढवा घेतला. अशा घटना रोखण्यासाठी पोलिस पाऊले उचलत आहेत. मागच्या एक वर्षापासून गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो.मराठवाड्यात येण्यापूर्वी हा मागास भाग असल्याचे बोलले जात होते. मात्र येथे काम करतांना लोकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळते. पोलिसांकडूनही लोकांची कामे तत्काळ झाली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करत असून लवकरच पोलिस विभागाची पुनर्बांधणी करणार असल्याचे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना म्हणाले.

बीड जिल्ह्यातील पोलिस दलाची वार्षिक तपासणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयजी के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्न हे बीड जिल्ह्यात डेरेदाखल झाले होते. पोलिस दलातील सर्व विभागाची तपासणी झाल्यानंतर त्यांनी मंगळवार (दि. 23 नोव्हेबर) रोजी दुपारी पोलिस अधिक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक आर. राजा, अप्पर अधिक्षक सुनिल लांजेवार उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी वार्षिक तपासणीत आढळून आलेल्या काही चुका आणि चांगल्या कामाचे कौतूकही केले. बीडचे अनेक ठाणेप्रमुख पदाचा बडेजाव करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनेक ठाणेप्रमुखांना त्यांच्या ठाण्यातील कर्मचार्‍यांची नावे देखील माहित नसल्याचे आयजींच्या निदर्शनास आले. पोलिस दलात जवळपास 90 टक्के कर्मचारी आहेत. त्यांना सन्मानाची वागणूकही काही ठिकाणी मिळत नसल्याचे त्यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आले. ठाणेप्रमुखांनी कर्मचार्‍यांशी सुसंवाद वाढवण्याच्या सुचनाही यावेळी आयजी यांनी केल्या. ठाण्यात आलेल्या लोकांची कामे तत्काळ झाली पाहिजेत. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयजींनी सांगितले. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिग वाढवण्यात येणार असून त्यासाठी वाहणे उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले. अंबाजोगाई बलात्कार प्रकरणात आरोपी म्हणून दोन पोलिस कर्मचारी असल्याचे समोर येत असल्याच्या पत्रकाराच्या प्रश्नावर आयजी म्हणाले की अंबाजोगाई बलात्कार प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, पोलिस असो वा राजकीय कोणालाच सोडले जाणार नाही. आम्ही कोणाला क्लिन चिट दिलेली नाही. वडवणी एपीआय मिरकर प्रकरणाची चौकशी अांबाजोगाई डीवाएसपींकडून करुन घेण्यात अयेणार असल्याचे आयजींनी सांगितले. त्याच बरोबर संमृधी जिवन घोटाळा प्रकरणी आरोपी बीड पोलिसांच्या ताब्यात असून त्याचा आढवा आयजींकडून घेण्यात आला. याचा तपास पूर्ण झाल्यानंतर नक्कीच ठेविदारांना त्यांचे पैसे परत मिळतील मात्र ति प्रक्रिया किचकट असल्याने त्यासाठी वेळ लागणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!