Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडसुमनबाई पाटील यांचे निधन

सुमनबाई पाटील यांचे निधन


बीड (रिपोर्टर)-सुमनबाई चंद्रसेन पाटील यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 79 वर्षे एवढे होते. त्या पिंपळनेरच्या माजी सरपंच सतीश पाटील व राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांच्या मातोश्री आहेत. आज दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थीवदेहावर सिंदी (ता. केज) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना बीड येथील रुग्णालयात दाखल करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. सुमनबाई चंद्रसेन पाटील या पिंपळनेरचे माजी सरपंच सतीश पाटील व राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांच्या मातोश्री आहेत. आज दुपारी दोन वाजता त्यांच्या मूळ गावी सिंदी (ता.केज) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परवा शुक्रवार रोजी सकाळ आठ वाजता सावडण्याचा कार्यक्रम असून त्यांच्या पश्‍चात चार मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पाटील कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

error: Content is protected !!