Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडशिवसेना प्रमुख ठाकरे यांना फसविणार्‍या आप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी करा

शिवसेना प्रमुख ठाकरे यांना फसविणार्‍या आप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी करा

शिवसेना शहरप्रमुख पापा सोळंके यांची मागणी
माजलगाव (रिपोर्टर)- मागील तीन वर्षांपूर्वी मुंबई येथे आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशादरम्यान त्यांच्यासोबत पाच कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. मी मोठा नेता असल्याचा कांगावा करत कुठलेही पद नसलेल्यांना पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सभापती असे सांगत मातोश्रीवर झालेल्या प्रवेश कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची फसवणुक केली. पदावर आल्यापासुन वरिल व अनेक कारणांमुळे वादग्रस्त असलेल्या आप्पासाहेब जाधव यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करा व निष्ठावंत शिवसेना कार्यकर्त्याची निवड करावी अशी मागणी शिवसेनेचे माजलगाव शहरप्रमुख पापा उर्फ धनंजय सोळंके यांनी केली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, आप्पासाहेब जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये केवळ आणि केवळ नंबर दोनचा धंदा आपला जोमात चालावा. त्यांचा असलेला वाळुचा व्यवसाय यामुळे त्यांचेवर व त्यांचे नातेवाईकांवर वाळु तस्करीचे गुन्हे देखिल दाखल आहेत. परिणामी शिवसेना पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे आप्पासाहेब जाधव यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करा व निष्ठावंत शिवसेना कार्यकर्त्याची निवड करावी असे निवेदन सेनेच जेष्ठ नेते खा. देसाई साहेबांकडे दिले असुन त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. राष्ट्वादी काँग्रेस पक्षातून तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत तिघा जणांनी पक्षात प्रवेश केला. यात रमेश शिंदे हा पंचायत समिती सदस्य दाखवून तर भागवत शिंदे यांना माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच सभापती दाखवून पक्षात प्रवेश केला. वास्तविक पाहता हे दोन्ही लोक कोणत्याही संस्थेचे पदाधिकारी नाहीत. त्याचबरोबर वीस वर्षांपासुन शिवसेनेत असलेले दासू बादाडे हे शिवसेनेत केवळ तालुका संघटक, जिल्हा उपप्रमुख अशी पदे भूषविली होती. ते केव्हाही नगरपालिका निवडणूक उभे राहिले किंवा ते निवडूण आले असे झालेले नाही तरीपण आप्पासाहेब जाधव यांनी दासू बादाडे यांना राष्ट्वादीचे नगरसेवक असे संबोधून पक्षात प्रवेश केला. जाधव यांनी पक्षात खूप मोठे नेते आणले म्हणून जुन्या शिवसैनिकाला डावलून त्यांना तात्काळ तालुका प्रमुख पद देण्यात आले. यामुळे येथे असलेल्या जुन्या सैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. यादरम्यान आप्पासाहेब जाधव यांचे शिवसेना पक्षवाढीसाठी काहीच काम नसल्याचा आरोप वारंवार होतांना दिसत आहे. त्यानंतर पक्षाला अंधारात ठेवून त्यांनी खूप कार्य केल्याचे दाखवत जिल्हाप्रमुख पद मिळविले. त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर माजलगाव येथे जाधव व शिवसेनेचे माजलगाव शहरप्रमुख पापा सोळंके यांच्या दोन गटात राडा देखिल झाला होता. ते जिल्हाप्रमुख झाल्यानंतरही शिवसेनेत वेगळीच खदखद दिसून येत होती.

तीन वर्षात दोन प्रमुख पद
शिवसेनेत वर्षानुवर्षे काम केल्यानंतरही अनेकांना पदे भेटले नाहीत तर काहींना परिस्थिती नसतानाही शिवसेनेने आमदार ,खासदार केले. येथे अनेक वर्षापासून शिवसेनेत असलेल्या कार्यकर्त्यांना डावलून आप्पासाहेब जाधव यांना पक्षात प्रवेश केल्यानंतर केवळ तीन वर्षात तालुकाप्रमुख व जिल्हा प्रमुख पद मिळाले.


पक्षप्रमुखांची दिशाभूल केल्याचा व्हिडीओ व्हायरल
मागील तिन वर्षांपूर्वी प्रवेशावेळी शिवसेनाप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांची कसी फसवणुक केली याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याने सध्या सत्तेत मुख्यमंत्री असलेल्या व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जिल्हाप्रमुखांकडुनच कशी दिशाभूल केली हा चर्चेचा विषय बनला आहे.

मी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांची वेळ घेउन शिवसेनेच निष्ठावंत कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेउन ज्या – ज्या संस्थेचे पदाधिकारी दाखवलेत त्या संस्थेची सर्टीफिकेट कॉपी घेउन कशी फसवणुक केलेली आहे हे लवकरच दाखवून देणार आहे.

  • पापा सोळंके,
    शिवसेना शहरप्रमुख.

Most Popular

error: Content is protected !!