Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडशिवसेना सावध, मोठ्या चाचपणीतून जिल्हाप्रमुखाची निवड होणार

शिवसेना सावध, मोठ्या चाचपणीतून जिल्हाप्रमुखाची निवड होणार


बीडचे इच्छुक काल सेना सचिव, संपर्कप्रमुखांना भेटले
आज मराठवाडा समन्वयकाची भेट घेणार
मुंबई (रिपोर्टर)- शिवसेना जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर नवीन जिल्हाप्रमुखासाठी मुंबईतल्या शिवसेना भवनात इच्छुकांनी मोठी गर्दी केली असून शिवसेनेचे सचिव अनिल देसाई व संपर्कप्रमुख आनंद जाधव यांची अनेक इच्छुकांनी भेट घेऊन जिल्हाप्रमुख पदावर दावा केला तर आज हे सर्वजण शिवसेनेचे मराठवाडा समन्वयक विश्‍वनाथ नेहरुरकर यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेने बीडच्या जिल्हाप्रमुख पदाबाबत प्रचंड सस्पेन्स ठेवत चाचपणी सुरू ठेवली आहे. त्यामुळे बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.


रिपोर्टरला मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारनंतर शिवसेना भवनात शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, संपर्कप्रमुख अनिल जाधव यांच्याशी इच्छुकांनी भेटी घेतल्या. जिल्हाप्रमुखपदाच्या रेसमध्ये अनेक जणांची नावे समोर येत असून काल अनिल जगताप, दिलीप गोरे, बाळासाहेब पिंगळे, युद्धाजित पंडित, परमेश्‍वर सातपुते, नितीन धांडे, उल्हास गिराम, बप्पासाहेब घुगे, पप्पु बरिदे यांनी भेटी घेतल्या आहेत. शिवसेनेने सस्पेन्स आज दुपारपर्यंतही कायम ठेवले आहे. बीडला चारित्र्यवान आणि पक्षासाठी कर्तृत्ववान असा जिल्हाप्रमुख देण्याच्या हालचाली करत त्या दृष्टीने पक्षाकडून चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. दस्तुरखुद्द आदित्य ठाकरे या निवडीकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत असून आज सर्व इच्छुक शिवसेनेचे मराठवाडा समन्वयक विश्‍वनाथ नेहरुरकर यांची भेट घेणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!