Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीलस नाही तर आष्टी, गेवराईत प्रवेश बंद शहराबाहेर नाकाबंदी, गावागावात लसीकरण कॅम्प

लस नाही तर आष्टी, गेवराईत प्रवेश बंद शहराबाहेर नाकाबंदी, गावागावात लसीकरण कॅम्प


गेवराई/आष्टी (रिपोर्टर) :-कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस हा एकमेव उपाय उपलब्ध आहे. त्यामुळे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आष्टी शहरातून जाणार्‍या प्रवाशांना थांबवून लस टोचून पुढे प्रवेश दिला जात आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राहुल टेकाडे रस्तावर उतरुन पोलिस प्रशासन व हंबर्डे महाविद्याल-यातील एन एस एस चे विद्यार्थी यांच्या मदतीने ये जा करणा-या प्रवाशांचे लसीकरण सुरू असून दुपारी 12 वाजेपर्यंत 40 ते 50 नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, गेवराई शहरामध्येही लसीविना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यासाठी आज गेवराई शहराबाहेर जातेगाव रोड, मोंढा नाका येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन खाडे, डीवायएसपी स्वप्नील राठोड, गटविकास अधिकारी सचिन सानप, पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून शहरात येणार्‍यांची तपासणी करत पहिला डोस असलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला तर ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांना प्रवेश नाकारला.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी आष्टी तालुका आरोग्य विभागाने कठोर पाऊल उचलले आहेत.आष्टी शहरातून जाणार्‍या प्रत्येक प्रवाशांचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा लसीकरण करून घ्यावे तरच पुढे प्रवेश दिला जात आहे.किमान एकतरी डोस दिल्यानंतर च प्रवेश दिला जात आहे.आज दि.24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून लसीकरण सुरू असून दुपारी 12 पर्यंत 40 ते 50 प्रवाशांचे लसीकरण करण्यात आले आता आष्टी तून जाणार्‍या प्रवाशांना प्रमाणपत्र दाखवून लस घेतली असेल तरच प्रवेश दिला जात आहे.अन्यथा लसीकरण केले जात आहे.हे लसिकरण आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन,हंबर्डे कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, डॉ.संतोष जावळे, डॉ. अकोलकर, संदिप धस, उमेश जिबकाटे, दैवशाला आगवाने, मिरा पोटे, ईमामबी बेग,शुभांगी चौधरी, पोलिस बन्सी जायभाय, हंबर्डे महाविद्यालयाचे एन.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी प्रा.महेंद्र वैरागे,डॉ.रवि सातभाई,विद्यार्थी विश्वजित धोतरे,अजय मुरकुटे,वैभव हंबर्डे,भारत निकाळजे,रितेश तावरे,अभिजित तावरे,आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान गेवराई येथेही लसीकरणासाठी प्रशासनाने शहरबंदीची मोहीम आखली, ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांनाच शहरामध्ये प्रवेश दिला जात आहे. लस घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!