Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeसंपादकीयलस घ्या लस!!

लस घ्या लस!!


कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो पुर्ण संपलेला नाही. देशात 40 टक्यापर्यंत लोकांनी दोन्ही डोस घेतले. लसीकरणाला सुरुवात होवून या जानेवारीला एक वर्ष पुर्ण होईल. एका वर्षात देशातील सर्व नागरीकांना लस दिली जाईल असा दावा केला होता, पण तो दावा पुर्ण झालेला नाही. कोरोनाच्या लसीबाबत काही लोकात प्रचंड प्रमाणात गैरसमज आहेत. त्यामुळे लोक स्वत;हून लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत.


कुठलाही राष्ट्रीय उपक्रम असेल तर त्याला तितका प्रतिसाद मिळत नाही. देशात अज्ञानांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लोकात समज, गैरसमज मोठे असतात. बहुतांश लोक अफवांना जास्त बळी पडत असतात. स्वत: विचार करत नाहीत. दुसर्‍यांनी एखादी गोष्ट सांगितली की, ती त्यांच्या चटकन लक्षात येते. त्याची प्रसिध्दी करायला असे लोक मागेपुढे पाहत नाहीत. जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती. तेव्हा लोकांनी त्यावर तितका विश्‍वास ठेवला नाही. शासन काही तरी उगीच चुकीचं सांगत आहे, असं म्हणुन काहींनी त्याची खिल्ली उडवली होती,ज्यांनी, ज्यांनी कोरोनाची खिल्ली उडवली. त्यांना कोरोना झाल्यानंतरच कळलं की, कोरोना खराच आहे. कोरोनोमुळे भारतातील पाच लाखापेक्षा जास्त लोक मरण पावले. कोरोना हा संसर्ग फक्त भारतातच नाही, तो जगात आहे. सगळं जग गेल्या दोन वर्षापासून त्रस्त आहे. गेल्या वर्षी कोरोनाची लस बाजारात आली. अनेक कंपन्यांनी लस उपलब्ध केली असून अमेरिकेसारख्या देशांनी आपल्या देशात आता पर्यंत 80 टक्यापेक्षा जास्त लसीकरण करुन घेतलं, बहुतांश देशात 50 टक्कयापेक्षा कमी लसीकरण झाले. भारताचं उदहारण घेतलं तर भारतात आता पर्यंत फक्त 50 टक्कयाच्या आत लसीकरण झालं असून शंभर टक्के लसीकरण व्हायला आणखी किती दिवस लागणार असाच प्रश्‍न उपस्थित होवू लागला? दुसरी लाट आली तेव्हा लोकांनी हालगर्जीपणा केली, त्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत जास्त लोक मरण पावले. कोरोनाने जास्त प्रमाणात लोक मरू लागले हे लक्षात आल्यानंतर लोक जागृक होवून आपल्या आरोग्याची काळजी घेवू लागले. शहरी भागातील लोक सर्रास मास्कचा वापर करत होते. ग्रामीण भागात तितकी जागृती नव्हती. त्यामुळे खेड्यात मास्क वापरण्याचे प्रमाण फारच कमी होते. मास्क वापरण्या संदर्भात प्रशासनाला सक्ती करावी लागली होती. आज ही मास्क शंभर टक्के लोक वापरत नाहीत. दवाखान्यात, किंवा इतर ठिकाणीच मास्क वापरलं जातं. दोन डोस घेतल्यानंतर मास्क वापरलं पाहिजे असं तज्ञाचं मत आहे, पण या मताला लोक तितकी किंमत देत नाही हे दुर्देवच म्हणावं लागेल. लस घेतल्यांनतर कोरोनाचा संसर्ग कमी होईल असा दावा आहे, हा दावा खरा ठरत आहे. देशातील पन्नास टक्याच्या आता लसीकरणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त केला जात होता. अद्याप पर्यंत तिसरी लाट आली नाही, हे एक प्रकारे बरं झालं. सनासुदीचे दिवस निघून गेले. या दिवसात बाजारात मोठी गर्दी होती. गर्दीच्या काळात कोरोनाचा प्रसार झाला नाही हा लसीकरणाचा परिणाम आहे. सर्वांनी लस घ्यावी असं शासनाने आवाहन केलेलं आहे. कोरोनाचा प्रसार घटल्यामुळे लोक लस घेण्यास टाळाटाळ करु लागले. त्यामुळे लसीकरणाचा टक्का कमीच आहे. काही जिल्हयात प्रशसानाने लसीकरणासाठी कठोर पावले उचलले, तर काही ठिकाणी प्रशासनाने जाचक अटी ठेवून लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले. लसीकरणासाठी अत्यंत जाचक अटी ठेवता येत नाही, हुकूमशाहीसारखं वागता येत नाही. लसीकरण करुन घेण्यासाठी आरोग्य विभागाने शहराच्या आणि ग्रामीण भागात जावून कॅम्प आयोजित करायला हवे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, समासेवकांनी मदत घेवून जास्तीत जास्त लसीकरण करुन घेतले पाहिजे. दबावातून, किंवा कारवायातून जास्तीत, जास्त लसीकरण होणार नाही. उलट प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त होईल. 18 वर्षाच्या पुढील सर्वांना लस दिली जाते. शाळकरी मुलांना लस अजुनही दिली नाही. शाळा सुरु झाल्या असल्या तरी त्या पुर्ण सुुरु झाल्या नाहीत. 1 ते 4 चे वर्ग अजुन सुरु करण्यात आले नाहीत. लहान मुलांना कोरोनाचा धोका पाहता शाळा सुरु करण्यास विलंब करण्यात येत आहे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने जोमाने काम केले तर नक्कीच लसीकरणाचा वेग वाढल्याशिवाय राहणार नाही. शंभर टक्के लसीकरण करुन घेणं आणि त्याला सर्व नागरीकांनी प्रतिसाद देणं हे ही तितकचं गरजेचं आहे. शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतर कोरोनाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!