Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईत आढळले एकाच नंबरचे आठ रिक्षे डीबी पथकाचे प्रमुख साबळेंनी केली कारवाई

गेवराईत आढळले एकाच नंबरचे आठ रिक्षे डीबी पथकाचे प्रमुख साबळेंनी केली कारवाई


गेवराई (रिपोर्टर) गेवराई शहरातील रस्त्यावर एकाच नंबरच्या आठ अँटोरिक्षा धावत असल्याची माहिती मिळताच या सर्व रिक्षा गेवराई पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली. ही कारवाई डी. बी. पथकाचे प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्यासह पथकाने केली आहे.


दरम्यान एकाच नंबरच्या आठ रिक्षा पकडल्याने या रिक्षा चोरीच्या आहेत ? की एकाच परमीटवर आठ रिक्षा चालवण्यात येत होत्या याबाबत पोलिस तपास करत आहेत. शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीचे व एकाच नंबरचे आठ रिक्षे धावत होती. मात्र याची आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हती. विशेष म्हणजे या रिक्षा मालक व चालक यांना देखील याची कल्पना नसल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्या काही दिवसापासून सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या डी.बी. पथकाच्या धडक कारवाईत अनेक गुन्हे उघड होत आहेत. मागील आठवड्यात मोठ्या दोन कारवाईनंतर काल दि.24 रोजी त्यांनी केलेल्या कारवाईत ( एमएच 23 , टीआर -311 ) क्रमांकाची आठ ही रिक्षा पकडण्याने आहेत. या आठ ही रिक्षा गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले आसून या एकाच नंबरच्या आठही रिक्षा मालक व चालक यांची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथकप्रमुख सपोनि साबळे यांनी दिली. तर ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे प्रमुख प्रफुल्ल साबळे, जमादार विठ्ठल देशमुख, कृष्णा जायभाये, पोलीस नाईक शरद बहिरवाळ, नवनाथ गोरे यांनी केली. तर डी.बी.पथकाच्या या धडक कारवाई मोहिमेबद्दल वरिष्ठांसह सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!