Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडअवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवासह दोन ट्रक ताब्यात 60 लाखांचा मुद्देमाल जप्त;...

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवासह दोन ट्रक ताब्यात 60 लाखांचा मुद्देमाल जप्त; तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाची कारवाई


गेवराई (रिपोर्टर) रात्रीच्या दरम्यान अवैधरित्या अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या एका हायवासह दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हि कारवाई गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने बुधवार रोजी मध्यरात्री केली. दरम्यान मागील काही महिण्यापासून महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करत असून यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.


गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरि ’ वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. नदीपात्रात पाणी असताना देखील वाळू माफिया केनीच्या सहाय्याने दिवसभर वाळू उपसा करुन ती रात्री हायवा व ट्रकमधून चोरट्या मार्गाने वाहतूक करतात. याविरोधात महसूल , पोलिस प्रशासन सातत्याने कारवाई करत असताना देखील वाळू माफिया या कारवायांना भीक घालत नसून महसूल, पोलिस अधिकार्‍यांवर पाळत ठेवून वाळू उपसा व वाहतूक करतात. बुधवार रोजी रात्री अशाचप्रकारे गेवराई तालुक्यातील सुरळेगाव याठिकाणाहून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन खाडे यांनी पथकासह त्याठिकाणी धाड टाकली. यावेळी एक हायवा, दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि सर्व वाहने चकलांबा पोलिस ठाण्यात लावण्यात आली आसून पुढील कारवाई सुरू आहे. हि कारवाई तहसीलदार सचिन खाडे, मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, सानप, पखाले, तलाठी देशमुख, वाठोरे, ठाकुर, वाकोडे, पांढरे, अमित तरवरे, किरण दांडगे आदींनी केली.


या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर चकलांबा पोलिस ठाण्यात चालक, मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आसल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.दरम्यान मागील काही दिवसांपासून गेवराई तालुक्यात तहसीलदार खाडे हे वाळू माफियांविरोधात सातत्याने कारवाई करत आहे. त्यातच गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!