Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडएसटीच्या कर्मचार्‍यांनी शासनाला गाजर दाखवलं 21 व्या दिवशीही कर्मचारी आंदोलनावर ठाम

एसटीच्या कर्मचार्‍यांनी शासनाला गाजर दाखवलं 21 व्या दिवशीही कर्मचारी आंदोलनावर ठाम


बीड (रिपोर्टर)- एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या 21 दिवसांपासून संपावर आहेत. काल महामंडळाचे मंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना 41 टक्के पगार वाढीची घोषणा केली. मात्र कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम असून आंदोलन सुरुच आहे. बीडच्या डेपोमधील कर्मचार्‍यांचेही आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांनी गाजरं दाखवून शासनाचा निषेध केला.

एसटी महामंडळाचे विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या एकेविस दिवसांपासून कर्मचारी संपावर गेलेले आहेत. या संपाबाबत तोडगा काढण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल घेतला. कर्मचार्‍यांना 41 टक्के पगारवाढ देण्याची त्यांनी घोषणा केली मात्र कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम असून शासनाच्या या घोषणेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच असून बीड येथील कर्मचार्‍यांनी शासनाचा निषेध म्हणून गाजरं दाखवली. या वेळी अनेक कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!