Saturday, November 27, 2021
No menu items!
HomeUncategorizedपोलीस अधिक्षक कार्यालयासमोरच तोतया पोलिसाने वृद्धास लुटले

पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरच तोतया पोलिसाने वृद्धास लुटले


बीड (रिपोर्टर)- पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरून येणार्‍या एका 60 वर्षीय वृद्धाला पुढे चेकिंग सुरु आहे, असे म्हणून तोतया पोलिसाने वृद्धाच्या खिशाची झाडाझडती घेत त्यांना नकळत खिशातील साडेतीन हजार रुपये काढून घेतले व दमदाटी करून येथून सरळ निघून जाण्याचे सांगितले. घाबरलेला वृद्ध पुढे गेल्या त्यांनी आपले खिशे तपासल्यानंतर पैसे गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

बलभीम चौकात राहणार्‍या एका 60 वर्षीय अपंग व्यक्तीचे तहसील कार्यालयात काम असल्याने ते पायी तहसीलला गेले होते. मात्र अधिकारी गैरहजर असल्याने ते पुन्हा पायी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोरून सरकारी दवाखान्याकडे येत असताना पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या दोन्ही गेटच्या मधोमध तोतया पोलिसाने त्या वृद्धाला अडवले. पुढे चेकिंग आहे, तुमच्या या पिशवीत काय आहे, असे म्हणून कागदपत्राची पिशवी वृद्धाकडून घेत खिसे तपासले. त्या वृद्धाला न कळताच खिशातील साडेतीन हजार रुपये तोतया पोलिसाने काढून घेत तुम्ही गांजा विकत तर नाही ना, चला निघा इथून असे म्हणत वृद्धाला दमदाटी केली. घाबरलेले ते वृद्ध तेथून पुढे सरकारी दवाखान्याकडे गेले असता त्यांनी आपले खिसे तपासले असता आपले पैसे गायब झाल्याचे त्यांना समजले. वृद्धाने यासंदर्भात कुठलीही पोलिस तक्रार दिली नाही मात्र असा प्रकार इतरांबाबत होऊ नये, असे रिपोर्टर कार्यालयात येऊन त्यांनी सांगितले.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!