Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedपंकज कुमावत यांची आणखी एक कारवाई साडेपाच लाखाचा भेसळयुक्त खवा जप्त, व्हर्टिकल...

पंकज कुमावत यांची आणखी एक कारवाई साडेपाच लाखाचा भेसळयुक्त खवा जप्त, व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनी सील


बीड रिपोर्टर

केज मध्ये भेसळयुक्त खवा तयार करून त्याची विक्री होत असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच त्यांनी व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनी येथे धाड टाकून 2958 किलोग्राम किमती 5 लाख 37 हजार 480 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करून जप्त केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे नमुने सीए तपासणी कामे काढून घेऊन ताब्यात घेतले सदरची कंपनी पुढील आदेशापर्यंत सील केली आहे. ही कारवाई काल केली.

दिनांक 24/11 /20 21 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळाली केज ते बीड जाणारे रोडवर विखे पाटील सहकारी साखर कारखान्या समोर उंमरी शिवारात व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनी चे मालक धनंजय महादेव चोरे रा. जिवाचीवाडी केज हल्ली मुक्काम उमरी शिवार तालुका केज हे त्यांचे कंपनीमध्ये दुधाचे पावडर पासून बनावट खवा तयार करून त्याची बाहेर जिल्ह्यात विक्री करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावर सदर ठिकाणी छापा मारला यावेळी फूड अँड डॉग्स चे सहाय्यक आयुक्त सय्यद हस्मी साहेब व त्यांच्या सोबत अन्न सुरक्षा अधिकारी तन्मडवार व त्यांचे पथक यांना बोलून त्यांची मदतीने दोन पंच सह सदर कंपनीचे ठिकाणी जाऊन रात्री 21.00 छापा मारला असता सदर ठिकाणी दुधाचे पावडर मध्ये वनस्पती रूची तेल मिक्स करून त्यापासून तयार केलेले खव्याचे पदार्थ संशयित वाटल्याने अन्न सुरक्षा अधिकारी श्री सय्यद इम्रान हस्मी तन्मडवार यांनी सदर ठिकाणाहून 2958 किलोग्राम किमती 5 लाख 37 हजार 480 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करून जप्त केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे नमुने सीए तपासणी कामे काढून घेऊन ताब्यात घेतले सदरची कंपनी पुढील आदेशापर्यंत सील केली आहे सदरची कारवाई सहायक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब अन्नसुरक्षा पथकाचे अधिकारी सय्यद इम्रान हाश्मी ,तन्मडवार, मुकतार व पोलीस उपनिरीक्षक मारुती माने पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर पोलीस नाईक रामहरी भंडाने राजू वंजारे सचिन आहंकारे संतोष राठोड शेंडगे मपोना पाचपिंडे यांनी केली आहे.

inbound4052873476919100988
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!