Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडनगराध्यक्षांसह नगरसेवकांचे प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका

नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका


बीड (रिपोर्टर):- जीवन प्राधिकरणांतर्गत शहरामध्ये सुरू असलेली कामे वेळेत झाली नसल्याने याबाबत नगर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर व त्यांच्या गटाचे नगरसेवक यांचे प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे व तात्काळ कामे पुर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

बीड शहरातील मलनिसारण प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामाचे कंत्राट गुत्तेदाराला देण्यात आलेले आहे. १ महिन्यामध्ये काम पुर्ण करण्याचा अल्टीमेट देवूनही कामे वेळेमध्ये पुर्ण झाली नसल्याने नगर परिषदेचे अध्यक्ष व त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी कामाच्या संदर्भात प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. दरम्यान कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे, सदरी कामे तात्काळ पुर्ण करण्यात यावे यासह इतर मागण्या नगराध्यक्षांनी केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!