Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडखांडेंचं स्पष्टीकरण, इच्छुकांची परतवारी जिल्हाप्रमुख पदाचा निर्णय अद्याप ‘जैसे थे’

खांडेंचं स्पष्टीकरण, इच्छुकांची परतवारी जिल्हाप्रमुख पदाचा निर्णय अद्याप ‘जैसे थे’

नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेला करावी लागणार लवकर घोषणा
बीड (रिपोर्टर):- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद मिळवण्यासाठी लॉबींग करायला गेलेल्या इच्छुकांच्या हाती गेल्या तीन दिवसाच्या कालखंडात निराशा आली असून शिवसेनेने बीडच्या जिल्हाप्रमुख पदाबाबत कुठलाही निर्णय घेतला नसल्याने इच्छुकांना परत यावे लागले आहे. दुसरीकडे काल माजी जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी गुटखा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेवून आपली बाजू मांडली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष असले तरी शिवसेना पक्षाला नगर पंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन दिवसात जिल्हाप्रमुख पदाची निवड करावी लागणार आहे.


गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने कुंडलीक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला पाच दिवसापूर्वी स्थगिती देण्यात आली. परवा कुंडलीक खांडे यांची गुटखा प्रकरणात जामीन झाल्यानंतर काल खांडेंनी पत्रकार परिषद घेवून आपली बाजू मांडली. तत्पुर्वी गेल्या तीन दिवसाच्या कालखंडात बीड जिल्ह्यातून शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अनेक इच्छुकांनी मुंबई गाठत शिवसेना भवनात डेरेदाखल होवून आपआपल्या पद्धतीने लोकप्रतिनिधीसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेत लॉबींग करायला सुरूवात केली. तीन दिवसात अनेक पदाधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर सर्व इच्छुक कालपासूनच परतीच्या मार्गावर लागले. अनेक जण बीडमध्ये डेरेदाखल झाले. मात्र या पाच दिवसाच्या कालखंडात शिवसेनेने जिल्हाप्रमुख पदाचं सस्पेंस कायम ठेवल्याने इच्छुकांचा हेरमोड झाला. बीडला जिल्हाप्रमुख पद देणेबाबत शिवसेना अनेक चाचपण्या आणि राजकीय फायद्यासह शिवसेना वाढीला महत्त्व देत आहे. या पदाची निवड शिवसेनेला लवकर करावी लागणार आहे. कारण नगर पंचायतीच्या निवडणुका घोषीत झाल्या असून बीड जिल्ह्यात पाच नगर पंचायतींपैकी तीन नगर पंचायती स्थगित करण्यात आलेल्या शिवसेना प्रमुखांच्या अधिपत्त्याखाली येतात. खांडे यांच्या कार्यक्षेत्रात आष्टी, पाटोदा, शिरूर असल्याने या तीनही नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी शिवसेनेला जिल्हा प्रमुख पदाची घोषणा लवकरच करावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!