Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडनांदूरघाटमध्ये सोन्याचे दुकान फोडले सोन्या-चांदीसह रोख रक्कम पळविली चोरटे सीसीटीव्हीत कैद

नांदूरघाटमध्ये सोन्याचे दुकान फोडले सोन्या-चांदीसह रोख रक्कम पळविली चोरटे सीसीटीव्हीत कैद

केज (रिपोर्टर)- केज तालुक्यातील नांदुरघाट येथील एका सोन्याच्या दुकानाचे कुलूप तोडून रात्री चोरट्यांनी दुकानातील सोने-चांदीसह नगदी ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दुकानातील कपाट घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
शाम महामुनी (रा. नांदुरघाट) यांचे शाम अलंकार नावाचे सराफा दुकान नांदुरघाट येथे आहे. रात्री ते दुकान बंद करून घरी गेले असता मध्यरात्री अज्ञात चार चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत सात ग्रॅम सोने व साडेतीन ते चार किलो चांदी आणि गल्ल्यातील काही नगदी रक्कम लंपास केली. दुकानातील कपाट चोरट्यांनी दुचाकीवरून गावालगत असलेल्या नदीत नेऊन तेथे फोडले व नदीत कपाट फेकून चोरट्यांनी तेथून पळ काढला. हे चोरटे कपाट घेऊन जात असताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. घटनेची माहिती केज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!