Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमसहायक पोलीस अधिक्षक कुमावतांचा गेवराईत वाळु माफियांना दणका

सहायक पोलीस अधिक्षक कुमावतांचा गेवराईत वाळु माफियांना दणका


दोन हायवासह लोकेशन देणारी गाडी घेतली ताब्यात
बीड (रिपोर्टर)- केज येथील सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे. जिल्हाभरात त्यांच्या कारवाया सुरू असून काल भेसळयुक्त खव्याच्या साठ्यावर धाड टाकल्यानंतर रात्री गेवराईत दोन हायवा लोकेशन देणार्‍या तिघांसह एक गाडी पकडली. त्यांच्यावर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


सहायक पोलीस अधिक्षक यांना गेवराई हद्दीत म्हासळपिंपळगाव येथील नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वत: पंकज कुमावत यांनी रात्री साडेबारा वाजता म्हाळसपिंपळगाव गाठून लोकेशन देणारे तिघे जण व आय ट्वेंटी गाडी ताब्यात घेऊन वाळुने भरलेले दोन हायवा ताब्यात घेतले. तर वाळु उपसा करणारे एक ट्रॅक्टर पळून गेले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पंकज कुमावत यांच्यासह सपोनि. संतोष मिसले, पो. उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, मारुती माने, पो.हवालदार बालासाहेब दराडे, बाबासाहेब बांगर, विकास चोपणे, महादेव सातपुते, रामहरी बंडाने, दिलीप गिते, राजू वंजारे, मतीन शेख, चालक यादव यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!