Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकिती ताणून धरणार?

किती ताणून धरणार?


मजीद शेख
बीड- एसटी कर्मचारी २२ दिवसापासून संपावर आहेत. अधिकारासाठी संप करणे हे योग्य असले तरी आंदोलन करण्याच्या काही मर्यादा आहेत. त्याचं उल्लघन होता कामा नये. एसटी. महामंडळ नेहमीच तोट्यात असतं. त्याला वेगवेगळे करणे आहेत, त्याचा शोध घेतला जात नाही. त्यावर ठोस काही भुमिका घेतली जात नाही. कर्मचार्‍यांना अत्यंत कमी पगार आहे, कमी पगारात काही होत नाही. महामंडळाच्या संघटनांनी पुर्वीपासूनच पगारासाठी आताच्या सारखी ठोस व आक्रमक भुमिका घेतली असती तर आता पर्यंत महामंडळाच्या कर्मचार्‍यांना चांगला पगार राहिला असता. आताच्या आंदोलनातून बरचं काही साध्य झाल्यासारखं आहे. ४१ टक्के पगार वाढ करण्यात आली. तरी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे, म्हणजे हे अतिच ताणुन धरल्यासारखं होवू लागलं.
एसटीच्या कर्मचार्‍यांची व्यथा नेहमीच समोर आलेली आहे. कर्मचार्‍यांना पगार कमी असल्यामुळे त्यांच्या कुटूंबाचा गाडा इतक्या कमी पगारात चालत नाही. काही कर्मचारी कर्जबाजारी होवून शेवटी ते नैराश्यात जातात, त्यातून आत्महत्या सारख्या घटना घडतात. गेल्या वर्षभरात ३० पेक्षा जास्त कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलेलं आहे. एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्यात यावे म्हणुन गेल्या २२ दिवसापासून आंदोलन सुुरु आहे. या आंदोलनामुळे राज्यातील एसटीची वाहतूक ठप्प झालेली आहे. यात महामंडळाचं कोटयावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. एसटी बंद असल्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा झाले. ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरीकांना प्रवासासाठी खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. एसटी बंद असल्यामुळे खाजगी वाहतुकदार मोठया प्रमाणात लुट करु लागले. २२ दिवसापासून आंदोलन सुरु असल्यामुळे सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. एसटीच्या कर्मचार्‍यां सोबत अनेक वेळा चर्चा ही झाल्या आहेत, पण आंदोलनावर काही ठोस तोडगा निघाला नाही. अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना ४१ टक्के पगार वाढ करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय आंदोलातून कर्मचार्‍यांनी मिळवला. कर्मचार्‍यांनी यावर विचार करायला हवा होता. मात्र कर्मचारी विलनीकरणावर ठाम असल्यामुळे ते आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे सरकार पेचात पडलेलं आहे. कुठला ही तोडगा चर्चेतून सोडवला तर नुकसान टळतं, पण चर्चेतून मार्गच काढला जात नसेल तर त्यात नुकसान होतं. एसटीच्या कर्मचार्‍यांनी आपलं आंदोलन इतकं ही ताणुन धरणं योग्य नाही,असं आता वाटू लागलं.


पडळकर, खोत, सदावर्ते यांची भूमिका


जेव्हा एसटीच्या कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरु केलं, तेव्हा या आंदोलनात संघटना आणि कर्मचार्‍यांचा सहभाग होता. मात्र भाजपाने आंदोलनात सहभाग घेवून यात जास्तच राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. मुंबई येथील आंदोलनात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांचा सहभाग होता, हे दोघे काही दिवस आझाद मैदानात आंदोलनात बसलेले होते. पाच वर्ष भाजपाचं सरकार होतं. तेव्हा भाजपाने विनीकरणाची भुमिका का मनावर घेतली नाही. विलनीकरणाचा प्रश्‍न अनेक वर्षापासूनचा आहे. सदाभाऊ खोत मंत्री होते, त्यांनी तरी विधीमंडळात कधी एसटीच्या कर्मचार्‍याबाबत आवाज उठवायचा, ते कधीच बोलले नाहीत. आज ते आंदोनल करतात म्हणजे आश्यर्चच म्हणावं लागेल. मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस विलनीकरणाच्या निर्णयाबाबत चर्चा करु शकत नव्हते का? त्यांनी कधी एसटीच्या प्रश्‍नाबाबत गांभीर्याने घेतलं नाही. त्यामुळे त्यांना आज एसटीच्या कर्मचार्‍या बाबत बोलण्याचा तितका अधिकार राहत नाही. ऍड. गुणरत्न सदावर्ते हे वादग्रस्त वकील आहेत, ते आज एसटीच्या कर्मचार्‍यात घुसले व मोठ, मोठ्याने घोषणा देवू लागले. सदावर्ते या आंदोलनात आले कसे? याचा अनेकांना प्रश्‍न पडला. सदावर्ते यांचा कर्ताकरवीता कोण आहे? पाठीमागच्या प्रकरणाचा आणि आताच्या, याच्या ही चर्चा होवू लागल्या. एकूणच आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचं काम ही मंडळी करू लागली.

Most Popular

error: Content is protected !!