Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रआळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात; 2 वारकर्‍यांचा मृत्यू, 30 जण...

आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात; 2 वारकर्‍यांचा मृत्यू, 30 जण जखमी


मावळ (रिपोर्टर)- कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकर्‍यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला. यात 2 वारकर्‍यांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 30 वारकरी जखमी झालेत. ही घटना आज (27 नोव्हेंबर) सकाळी 7 च्या सुमारास कान्हेफाटा येथे घडली. यानंतर पिकअप चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने पायी जात होते. तेव्हा, जवळवून जाणार्‍या पिकअप चालकाचा वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि वारकर्‍यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली. यात, 30 वारकरी जखमी झाल्याची माहिती तपास अधिकारी वडगाव मावळचे पोलीस उपनिरीक्षक चामे यांनी दिली आहे. अद्याप गंभीर किती आहेत हे समजू शकेल नाही. जखमींना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!